शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

नरकेंचे कट्टर समर्थक किशोर पाटील यांना उमेदवारी मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:14 IST

कोपार्डे : करवीर तालुक्यातून शाहू आघाडीकडे इच्छुकांची मोठी गर्दी झाल्याने मागील निवडणुकीत लढत देणारे सतेज पाटील यांचे विश्वासू, तर ...

कोपार्डे : करवीर तालुक्यातून शाहू आघाडीकडे इच्छुकांची मोठी गर्दी झाल्याने मागील निवडणुकीत लढत देणारे सतेज पाटील यांचे विश्वासू, तर माजी आ. चंद्रदीप नरके यांचे कट्टर समर्थक कुंभी-कासारी कारखान्याचे संचालक किशोर पाटील यांना उमेदवारी मिळणार का, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

मागील निवडणुकीत किशोर पाटील यांना सतेज पाटील यांनी उमेदवारी दिली होती. त्यावेळी किशोर पाटील यांचा निसटता पराभव झाला होता. त्यानंतर ‘गोकुळ’संदर्भात गेल्या पाच वर्षांत घडलेल्या राजकीय व ‘गोकुळ’च्या लढतीत किशोर पाटील यांनी सतेज पाटील यांना साथ देत पडद्यामागे राहून सूत्रे हलवली होती. गेल्या निवडणुकीत निसटत्या मतांनी किशोर पाटील यांचा पराभव झाला होता. या पराभवाला कारणीभूत असणारे सर्व बारकावे हेरून ते दूर करण्यासाठी तयारी सुरू केली होती. ‘गोकुळ’ची निवडणूक जाहीर होताच किशोर पाटील यांनी जिल्ह्यातील दूध संस्था ठराव धारकांच्या गाठीभेटी घेऊन तयारी सुरू केली होती.

दरम्यान, ‘गोकुळ’च्या निवडणुकीचे नगारे वाजू लागले आणि सत्ताधारी गटातून फुटीचे हादरे बसू लागले. सत्ताधारी गटातील मातब्बरांनी विरोधी गटात प्रवेश केल्याने इच्छुकांची मोठी गर्दी झाली आहे. यात खुद्द किशोर पाटील यांच्या शिरोली गावचे ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांनी प्रवेश केल्याने नेत्यांच्या पुढे उमेदवारी देताना त्यात धर्मसंकट निर्माण झाले आहे. कुंभी कारखान्याचे गेली १५ वर्षे संचालक उपाध्यक्ष अशी किशोर पाटील यांची कारकीर्द असल्याने सहकारात मोठा कार्यकर्त्यांचा गोतावळा आहे. याचबरोबर सतेज पाटील यांचे विश्वासू व चंद्रदीप नरके यांचे कट्टर समर्थक असल्याने किशोर पाटील यांना उमेदवारी मिळणार का, याकडे लक्ष लागले आहे.