शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

‘खाकी’साठी ‘खादी’ उतरली रस्त्यावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2017 00:17 IST

सर्वपक्षीय पाठिंबा : आमदारांना नडणाऱ्या मांजरे यांचे निलंबन मागे घेण्यासाठी प्रसंगी तीव्र लढ्याची तयारी

प्रमोद सुकरे ल्ल कऱ्हाडशेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी काँगे्रस-राष्ट्रवादी संघर्ष यात्रेच्या निमित्ताने रस्त्यावर उतरली आहे. शिवसेनेचे नेतेही कर्जमाफीच्या सुरात सूर मिसळताना दिसतात. मात्र, दुसरीकडे कऱ्हाडचे काँगे्रसचे आमदार आनंदराव पाटील यांना नडणाऱ्या फौजदाराला निलंबित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर फौजदाराच्या समर्थनार्थ सत्ताधारी भाजप, सेना, स्वाभिमानीसह मनसेचे पदाधिकारीही रस्त्यावर उतरल्याचे चित्र कऱ्हाडला पाहायला मिळत आहे. संपूर्ण जिल्ह्यात त्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कऱ्हाड तालुक्यात प्रचारादरम्यान विधान परिषदेतील काँगे्रसचे आमदार आनंदराव पाटील यांच्या अंगरक्षकाला तांबवे येथे मारहाणीची घटना घडली होती. त्यानंतर लोकप्रतिनिधी असणाऱ्या आमदार आनंदराव पाटील यांना पोलिस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांनी चुकीची वागणूक दिली, असा आरोप होत आहे.दरम्यान, नुकत्याच झालेल्या अधिवेशनात काँगे्रसचे आमदार आनंदराव पाटील, रामहरी रूपनवर यांनी याबाबतची लक्षवेधी उपस्थित केली होती. त्यावर उत्तर देताना गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी कऱ्हाड तालुका पोलिस स्टेशनचे निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांना निलंबित करत असल्याची घोषणा विधान परिषदेत केली.दरम्यान, या घटनेनंतर सर्व स्तरांतून उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या. आनंदराव पाटील समर्थकांनी या निर्णयाचे स्वागत केले. मात्र, निलंबनाचा निर्णय चुकीचा आहे असं म्हणत आमदारांना नडणाऱ्या फौजदाराच्या समर्थनार्थ सत्ताधारी भाजप, सेना व स्वाभिमानी कार्यकर्त्यांसह मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन नलवडे व मनसेचे मनोज माळी यांनी याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. तर मंगळवारी कऱ्हाडच्या तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचे ठिय्या आंदोलनही झाले. या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन नलवडे, भाजपचे जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, शिवसेनेचे शहरप्रमुख शशिराज करपे, मनसेचे जिल्हा संघटक मनोज माळी, शिवसंग्रामचे रोहित पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. त्यामुळे काँगे्रस आमदारांच्या विरोधात आणि एका फौजदाराच्या समर्थनार्थ सत्ताधारी भाजप, सेना, स्वाभिमानीसह मनसे, शिवसंग्रामचे पदाधिकारी एकवटलेले दिसत आहेत.काय घडली होती घटना..!जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची धावपळ सुरू असताना तांबवे गावाजवळ आनंदराव पाटील यांचे वाहन अडविण्यात आले होते. त्यावेळी आमदार पाटील यांच्या अंगरक्षकाला प्रदीप जालिंदर पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मारहाण केल्याची तक्रार पोलिसांत दाखल आहे. पण ही तक्रार दाखल करायला गेलेल्या आमदार पाटील यांची मांजरे यांनी दखल घेतली नाही. त्यांना दोन तास पोलिस स्टेशनमध्ये बसवून ठेवल्याचा पाटील यांचा आरोप आहे.मांजरे कामावरच !तालुका पोलिस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांच्या निलंबनाची घोषणा होऊन आठ दिवस लोटले आहेत. मात्र, मांजरे प्रत्यक्षात आजही पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत दिसत असल्याने त्यांचे निलंबन मागे घेण्यात आल्याच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. प्रत्यक्षात मात्र, निलंबन झाले आहे की नाही. याबाबत अधिकृत माहिती देताना कोणीच दिसत नाही.