शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
3
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
4
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
5
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
6
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
7
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
9
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
10
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
11
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
12
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
13
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
14
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
15
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
16
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
17
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
18
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
20
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा

कोल्हापूरचा फुटबॉल अखंड ठेवणार

By admin | Updated: May 1, 2015 00:31 IST

सर्व संघांची ग्वाही : यापुढेही फुटबॉल स्पर्धांचे आयोजन करणार : गणी आजरेकर

कोल्हापूर : कोल्हापूरच्या फुटबॉलला महाराष्ट्रासह संपूर्ण देशात एक वेगळी ओळख आहे. त्याच खेळाच्या जोरावर अनेक खेळाडूंचे आयुष्य घडले आणि घडत आहे. अशी संस्थानकालीन परंपरा लाभलेल्या या खेळाच्या विकासासाठी सर्व संघांनी मतभेद विसरून एकत्र येण्याची ग्वाही कोल्हापुरातील सर्व फुटबॉल संघांनी गुरुवारी दिली. मुस्लिम बोर्डिंग येथे मुस्लिम बोर्डिंग चषक फुटबॉल स्पर्धेच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल आयोजित केलेल्या कार्यक्रमात निवासराव साळोखे यांनी ही माहिती दिली. साळोखे म्हणाले, संस्थानकाळापासून कोल्हापूरचा फुटबॉल सर्वश्रूत आहे. ही परंपरा केवळ एका स्पर्धेत झालेल्या हाणामारीमुळे जर बंद पडणार असेल तर ती बंद पडू देता कामा नये. याकरीता सर्व फुटबॉल संघांनी आपल्या खेळाडूंना शिस्त लावली पाहिजे. पुढच्या स्पर्धा व्हाव्यात. फुटबॉल स्पर्धांची व खेळाची परंपरा बंद होऊ नये याकरीता सर्वांनी एकत्रित येऊन निर्धार केला पाहिजे, असे आवाहन सर्व उपस्थित संघांच्या प्रतिनिधींना केला. त्यावर सर्व प्रतिनिधींनी त्यांच्या आवाहनास प्रतिसाद देत खेळाडूंना शिस्त व झालेल्या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही व कोल्हापूरचा फुटबॉल खेळ अखंडित राहणार असल्याची ग्वाही दिली. अध्यक्षस्थानावरून बोलताना मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष गणी आजरेकर म्हणाले, आपण केवळ कोल्हापूरचा फुटबॉलचा विकास व्हावा, या उद्देशाने दरवर्षी फुटबॉल स्पर्धा भरवितो. त्यात यंदा अंतिम सामन्यात दोन संघांच्या समर्थकांत हाणामारी झाली. संघाच्या समर्थकांबरोबरच संयोजक म्हणून मलाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत पोलिसांनी अपमानजनक वागणूक दिली तरीही पुढच्या वर्षी यापेक्षा अधिक जोमाने स्पर्धा भरवल्या जातील, असे त्यांनी सांगितले. छावा संघटनेतर्फे निषेधफुटबॉल स्पर्धेदरम्यान अंतिम सामन्यात झालेल्या मारामारीप्रकरणी सर्व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी छावा संघटनेने एका पत्रकाद्वारे केली आहे. याचबरोबर या घटनेचा निषेधही व्यक्त केला आहे. शाहू स्टेडियम येथे फुटबॉलच्या अंतिम सामन्यात दोन्ही संघांच्या समर्थकांनी स्टेडियम व स्टेडियमबाहेरही मारामारी केली. यामध्ये सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागला, तर काही वाहनांवर दगडफेक केली. तसेच एक महिला व मुलगी जखमी झाली. अशा प्रवृत्तींविरोधात पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी छावा संघटनेने एका पत्रकाद्वारे केली.पोलिसांनी सूडबुद्धीतून केलेल्या कारवाईच्या चौकशीची मागणीकोल्हापूर : जुना राजवाडा पोलीस ठाण्याने फुटबॉल स्पर्धेच्या परवानगीची दखल घेतली नाही; त्यामुळे थेट जिल्हा पोलीसप्रमुखांकडे पोलीस बंदोबस्ताची मागणी केल्याचा राग मनात धरून जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी मुस्लिम बोर्डिंग फुटबॉल चषक स्पर्धेच्या आयोजकांवर सूडबुद्धीने कारवाई केली आहे. या कारवाईची सखोल चौकशी करून, दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटी मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष गणी आजरेकर यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय वर्मा यांच्याकडे गुरुवारी केली. दरम्यान, पोलीस महानिरीक्षक वर्मा यांनी निवेदनाची गांभीर्याने दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांना तातडीने कार्यालयात बोलावून घेत या प्रकरणाची माहिती घेतली. याप्रसंगी प्रशासक कादर मलबारी, संचालक हमसेखान शिंदी, हाजी लियाकत मुजावर, रफिक मुल्ला, हाजी मुसा पटवेगार, अय्याज बागवान, निसार पठाण, मुस्ताक मुजावर, समीर मुजावर, फिरोज बागवान, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)