शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

सोन्यासारख्या ‘झेंडू’ला कवडीमोल दर

By admin | Updated: April 2, 2015 00:39 IST

बाजारात दोन ते तीन रुपये किलो दर : व्यापाऱ्यांकडून एक रुपये किलोने झेंडू मागून चेष्टा; उत्पादनखर्चही न मिळाल्याने शेतकरी अस्वस्थ

प्रकाश पाटील - कोपार्डे -उसाला पर्याय शोधत दररोज आर्थिक उत्पन्न मिळावे, यासाठी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी फूल शेतीचा पर्याय निवडला आहे. यात झेंडू फुलाला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले असले, तरी आज झेंडूचा दर दोन ते तीन रुपये किलोवर येऊन ठेपल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी येत आहे.जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून सर्वांत जास्त उसाला प्राधान्य दिले जाते. मात्र, ऊसपीक किमान १२ ते १६ महिने सांभाळावे लागते. त्याची तोड झाल्यानंतरही वेळेत पैसे न मिळण्याबरोबर उत्पादन खर्चाएवढा भाव मिळत नसल्याने काही प्रयोगशील शेतकरी वेगळा पर्याय शोधून आपले शेतीतून अर्थकारण सांभाळण्याचा प्रयत्न करतात. मात्र, यातही व्यापाऱ्यांची साखळी व बाजारपेठेचे योग्य नियोजन न समजल्याने शेतकऱ्यांची मोठी लूट होतानाचे चित्र पाहायला मिळत आहे.सध्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून झेंडू फूल शेतीला प्राधान्य दिले जात आहे. चार महिन्यांच्या पिकामधून चांगला आर्थिक फायदा मिळेल म्हणून अनेक शेतकरी या फूल शेतीकडे वळले आहेत. सध्या सर्वत्र लग्नसराई, तसेच धार्मिक व कौटुंबिक कार्यक्रमाचा हा कालावधी असताना व या फुलांना यावेळेला महत्त्व असतानाही झेंडूचा दर दोन ते तीन रुपये किलोवर घसरला असल्याने शेतकरी पुरता अडचणीत आला आहे. झेंडू हे नाशवंत असल्याने फुलाचा तोडा झाल्यानंतर आठ ते दहा तासांत त्याची विक्री झाली तरच फायद्याचे ठरते; अन्यथा तो कोमेजल्यास फेकून द्यावी लागतात. सध्या जिल्ह्यात कोठेही फुलांसाठी साठवणुकीला शीतकेंद्रे नाहीत आणि शेतकऱ्यांकडे तशी सोयही नाही.याचा फायदा बाजारातील खरेदी-विक्रीचे ज्ञान अवगत असणाऱ्या व्यापाऱ्यांकडून उठविला जात आहे. सध्या बाजारात झेंडूचा दर दोन ते तीन रुपये किलोवर घसरला असतानाही शेतकऱ्यांच्या आगतिकतेचा फायदा उठवत एक रुपया किलो दराने झेंडू फुले मागितली जात आहेत.या झेंडूच्या प्रतिरोपाची किंमत चार ते पाच रुपये असून, खते, पाणी, बुरशीनाशक, कीटकनाशक, फुले तोडणी मजुरी, वाहतूक याचा एकरी ४० ते ५० हजार रुपये खर्च आहे. मात्र, सध्या बाजारातील झेंडूला मिळणाऱ्या दराने १५ ते २० हजार रुपये प्रति एकर तोटा होणार आहे. यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. त्यातच अवकाळी पाऊस व हवामानातील बदलाने रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने फुलाच्या प्रतवारीवरसुद्धा परिणाम झाला आहे.