शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

करवीरनगरीने केला होता शाहू पुरस्काराने सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:25 IST

कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश पी. बी. सावंत यांच्या निधनामुळे कोल्हापुरातील चळवळीतील कार्यकर्त्यांना धक्का बसला. ६ डिसेंबर ...

कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश पी. बी. सावंत यांच्या निधनामुळे कोल्हापुरातील चळवळीतील कार्यकर्त्यांना धक्का बसला. ६ डिसेंबर १९९९ रोजी त्यांना केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या हस्ते मानाच्या राजर्षी शाहू पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यावेळच्या आठवणी सोमवारी जागविण्यात आल्या. शाहू विचारांचा पाईक हरपल्याची भावनाही त्यांच्या निधनानंतर व्यक्त झाली.

सावंत आणि दिवंगत नेते गोविंदराव पानसरे, बाबूराव धारवाडे यांचे घनिष्ट संबंध होते. त्यांच्याच स्नेहामुळे सावंत हे काही कार्यक्रमानिमित्त कोल्हापूरला येत असत. १९९९ चा शाहू पुरस्कार सावंत यांना जाहीर झाला. परंतु, चंद्रचूड यांची तारीख न मिळाल्याने पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम ६ डिसेंबर १९९९ला केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये घेण्यात आला होता. या कार्यक्रमाला कोल्हापूरवासीयांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी कोल्हापूर बार असोसिएशनच्यावतीनेही त्यांचा सत्कार करण्यात आला होता. कोल्हापूरच्या पुरोगामी चळवळीविषयी त्यांना आस्था होती.

इचलकरंजी येथील समाजवादी प्रबोधिनीचे शांताराम गरूड यांच्याशी त्यांचे घनिष्ट संबंध होते. प्रबोधिन प्रकाश ज्योती या नियतकालिकाचे नियमित वाचन करून ते नेहमी संपर्क साधत असत, अशी आठवण प्रबोधिनचे सचिव प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितली.

चौकट

पदावर असताना लिहिले पत्र

‘शिवाजी कोण होता’ हे पुस्तक वाचल्यानंतर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदावर असतानाही सावंत यांनी गोविंदराव पानसरे यांना पत्र लिहून त्यांचे अभिनंदन केले होते. प्रमुख कार्यकर्त्यांपर्यंत हे पुस्तक पोहोचण्याची गरज असून तशी योजना आपण आखावी, अशी अपेक्षाही त्यांनी पत्रात व्यक्त केली होती. अशी आठवण ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर यांनी सांगितली.

कोट

एका नि:स्पृह, प्रामाणिक, समाजाशी नाळ जुळलेल्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाला आपण मुकलो आहोत. निवृत्तीच्या काळातही कुलगुरू निवडीपासून ते गुजरात दंगलीपर्यंतची, तेथील भ्रष्ट सताधाऱ्यांची चौकशी करण्याची कामगिरी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. त्यांच्या नि:स्पृह स्वभावाची यामुळे साक्ष मिळते. सावंत यांच्या निधनामुळे केवळ न्यायालय आणि कायद्याशी संबंधितच नव्हे, तर समाजाचीही हानी झाली आहे.

ॲड. अभय नेवगी,

उच्च न्यायालयाचे वकील

१५०२२०२१ कोल पी. बी. सावंत

कोल्हापूर येथे ६ डिसेंबर १९९९ रोजी न्या. पी. बी. सावंत यांना न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या हस्ते मानाच्या राजर्षी शाहू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.