शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडचे दहा पोलिस न्यायालयात शरण-

By admin | Updated: December 28, 2016 00:19 IST

-रावसाहेब जाधव खूनप्रकरण पाच दिवसांची पोलिस कोठडी

कऱ्हाड : करमाळा येथील रावसाहेब जाधव खून प्रकरणातील फरार पोलिस मंगळवारी कऱ्हाड जिल्हा सत्र न्यायालयासमोर शरण आले. सहायक निरीक्षक हणमंत काकंडकी यांच्यासह संबंधित दहा पोलिसांना गुप्तचर विभागाने अटक केली असून, त्यांना पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.हणमंत लिंगाप्पा काकंडकी, दिलीप मारुती क्षीरसागर, सुधीर सुभाष जाधव, राजकुमार भीमाशंकर कोळी, अतुल संपतराव देशमुख, नितीन चंद्रकांत कदम, सुमित विजय मोहिते, शरद सोमाजी माने, संजय मानाजी काटे, अमोल अर्जुन पवार अशी ‘सीआयडी’ने अटक केलेल्यांची नावे आहेत. खासगी बसमधून ७७ लाखांचे अडीच किलो सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची घटना मे २०१६ मध्ये कऱ्हाडमध्ये घडली होती. याबाबतचा गुन्हा कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास धस या प्रकरणाचे तपासी अधिकारी होते. या प्रकरणातील संशयितांबाबत गुन्हे प्रकटीकरण शाखेला माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक हणमंत काकंडकी यांच्यासह सहा कर्मचारी संशयित रावसाहेब जाधवला ताब्यात घेण्यासाठी गेले. त्यांनी रावसाहेब जाधवसह अनिल दशरथ डिकोळे (वय ३६, रा. घोटी, ता. करमाळा, जि. सोलापूर) याला ताब्यात घेऊन कऱ्हाडमध्ये आणले. १८ जूनला तपासकामी त्या दोघांना घेऊन पोलिस कार्वेनाका चौकीत गेले होते. त्याठिकाणी प्रकृती खालावल्याने जाधवला उपचारार्थ सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याच दिवशी दुपारी चार वाजता त्याचा मृत्यू झाला. रावसाहेबचा मृत्यू झाल्याचे समजताच करमाळा येथील जमाव पोलिस ठाण्यात जमा झाला. या जमावाने पोलिसांना अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली. तसेच तहसील कार्यालयावरही आक्रमक (पान १ वरून) या जमावाने पोलिसांना अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली. तसेच तहसील कार्यालयावरही आक्रमक मोर्चा काढला. अखेर पोलिस अधीक्षकांनी निरीक्षक विकास धस यांच्यासह बारा पोलिसांना निलंबित केले. तसेच मृत रावसाहेबचा मेहुणा अनिल डिकोळे याच्या फिर्यादीवरून बारा पोलिसांवर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणातील सर्व पोलिस आरोपी तेव्हापासून फरार होते. ‘सीआयडी’ने संबंधित पोलिसांच्या घरांवर छापा टाकला. तसेच त्यांची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रियाही सुरू केली. याचदरम्यान या प्रकरणात हवालदार कृष्णा खाडे यालाही ‘सीआयडी’ने अटक केली.दरम्यान, या प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी निरीक्षक धस यांनी न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने तो अर्ज फेटाळून हणमंत काकंडकी यांच्यासह दहा पोलिसांना २७ डिसेंबरपर्यंत प्रथम वर्ग न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मंगळवारी संबंधित दहा पोलिस दुपारी न्यायालयात हजर झाले. - चौकटविकास धस यांची न्यायालयात याचिकावरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास धस यांनी या प्रकरणाच्या फिर्यादीलाच आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्या याचिकेवर अद्याप सुनावणी सुरू आहे. न्यायालयाने या प्रकरणात सरकार पक्षाला म्हणणे मांडण्याचे आदेश दिले होते. घटनाक्रम१८ जून रावसाहेब जाधवचा मृत्यू१८ जून सीआयडी पथक कऱ्हाडमध्ये१९ जून शेकडोंचा जमाव पोलिस ठाण्यात१९ जून कऱ्हाडचे बारा पोलिस निलंबित२० जून जमावाचा तहसील कार्यालयावर मोर्चा२० जून विकास धस यांच्यासह बाराजणांवर खुनाचा गुन्हा२१ जून रावसाहेब जाधवच्या मृतदेहावर निंभोरेत अंत्यसंस्कार२४ जून कऱ्हाडमधील पोलिसांचे जबाब नोंदविले२७ जून विकास धस यांचा अटकपूर्वसाठी न्यायालयात अर्ज१६ जुलै हवालदार कृष्णा खाडेला अटक२० डिसेंबर दहा पोलिसांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश२७ डिसेंबर काकंडकी यांच्यासह दहाजण हजरदीड तास वकिलांचा युक्तिवाद सहायक पोलिस निरीक्षक हणमंत काकंडकी यांच्यासह संबंधित दहा पोलिस स्वतंत्रपणे न्यायालयाच्या आवारात हजर झाले. दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास ते न्यायालयाच्या आवारात एकत्र आले. तेथून ते सर्वजण एकत्रित प्रथमवर्ग न्यायाधीशांसमोर हजर झाले. त्यानंतर सुमारे दीड तास सरकार पक्षासह बचाव पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू होता. यावेळी ‘सीआयडी’चे अधिकारी एस. एन. जगताप यांच्यासह पथक हजर होते.