शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

उदगावात कर्नाटकातील विद्यार्थ्यांना कन्नड शिक्षण

By admin | Updated: January 17, 2017 00:20 IST

कामगारांच्या सहाशे मुलांना शिक्षण : उदगाव, चिंचवाडमधील शाळांचा पुढाकार

संतोष बामणे ल्ल जयसिंगपूरमहाराष्ट्र शासनाच्या सारे शिकूया, पुढे जाऊया या धोरणाप्रमाणे एकही मूल निरक्षर राहू नये यासाठी शासन युद्धपातळीवर लक्ष देऊन शिक्षणाची मोहीम राबवीत आहे. गेल्या अकरा वर्षांपासून शिरोळ तालुक्यातील उदगाव, चिंचवाड येथे वीटभट्टीवर काम करणाऱ्या कर्नाटकातील कामगारांच्या मुलांना शिक्षणाची सोय करून दिली आहे. त्यामुळे कर्नाटकातील मुलेही महाराष्ट्रामध्ये कन्नड भाषेत शिक्षित होत आहेत. दुष्काळी भाग व हाताला काम न मिळाल्याने कर्नाटकातील मजूर तालुक्यात मोलमजुरी करण्यासाठी येतात. साखर कारखान्यांच्या ठिकाणी साखरशाळा चालविल्या जातात. यामध्ये ऊसतोड मजूर हे मराठवाड्यातील असल्याने मराठी शिक्षण त्यांच्या मुलांना मिळते. मात्र, वीटभट्टीच्या कामावर आलेल्या कर्नाटकातील कामगारांची मुले निरक्षर राहू नयेत यासाठी उदगाव येथील देसाई विद्यामंदिर, कन्या विद्यामंदिर, उदगाव टेक्निकल हायस्कूल, चिंचवाड कुमार विद्यामंदिर व कन्या विद्यामंदिरच्या शिक्षकांनी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी कन्नड भाषेतील शिक्षक उपलब्ध करून दिले आहेत. २००५ पासून उदगाव, चिंचवाड परिसरात वीटभट्टीचा व्यवसाय आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या मजुरांची मुले निरक्षर राहत असल्याचे पाहून २००७ पासून कानडी भाषेतील शिक्षण या मुलांना उपलब्ध करून दिले आहे. यंदाच्या वर्षी चिंचवाड येथे ३५, तर उदगाव येथे ४२ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय करण्यात आली आहे. आतापर्यंत ६०० हून अधिक विद्यार्थ्यांनी येथे शिक्षण घेतले आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी दुपारच्या जेवणाची सोय, पुस्तके, वह्या, पेन, कपडे यांची सोयही करून दिली आहे. तसेच वीटभट्टीच्या मुलांसाठी अनेक सामाजिक संस्था मदत करण्यासाठी पुढे सरसावत आहेत. ही शाळा चालविण्यासाठी सुरगोंडा पाटील, सतीश पाटील, मुख्याध्यापक विजय कोळी, शोभा कोळी, मुख्याध्यापक रावसाहेब इंगळे, गटविस्तार अधिकारी वांद्रे, विस्तार अधिकारी अनिल ओमासे यांच्या सहकार्यातून प्रयत्न सुरू आहेत.