शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

कणबरकर अनंतात विलीन

By admin | Updated: April 15, 2015 00:42 IST

पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यविधी : विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू, ज्ञानतपस्वी प्राचार्य डॉ. रा. कृ. कणबरकर यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी अकराला पंचगंगा स्मशानभूमीत विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार झाले. उपस्थितांनी त्यांना साश्रुपूर्ण नयनांनी अंतिम निरोप दिला. आज, बुधवारी सकाळी नऊला रक्षाविसर्जन होणार आहे. डॉ. कणबरकर यांचे भोगावती (ता. करवीर) येथे त्यांचे चिरंजीव डॉ. अरुण यांच्या निवासस्थानी सोमवारी रात्री निधन झाले. त्यांचे पार्थिव सोमवारी सकाळी नाळे कॉलनीतील ‘शालिनी’ निवासस्थानी आणले. इथे माजी आमदार बाबूराव धारवाडे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील, प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक भोईटे, माजी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, उपजिल्हाधिकारी विवेक आगवणे, व्ही. टी. पाटील, उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, डॉ. डी. के. गायकवाड, डी. वाय. पाटील शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, हुतात्मा कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी, प्राचार्य अभयकुमार साळुंखे, प्राचार्य डॉ. हिंदुराव पाटील, डॉ. एस. ए. बोजगर, सुधाकर मानकर, आदींनी अंत्यदर्शन घेतले. पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. यावेळी जावई डॉ. बा. प. साबळे, बाबासाहेब खोत, प्रकाश वागळे, नातू अभिषेक कणबरकर, ओंकार खोत आदी उपस्थित होते. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील, डॉ. अशोक चौसाळकर, ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ प्रा. डॉ. जयसिंगराव पवार, ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, डॉ. रमेश जाधव, इंद्रजित सावंत, डॉ. क्रांतिकुमार पाटील, डॉ. डी. आर. मोरे, एन. व्ही. नलवडे, प्राचार्य टी. एस. पाटील, अरुण भोसले, एस. आर. यादव, भालबा विभूते, रमेश पोवार, चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, अनिल चौगुले, नामदेव गावडे, किसन कुराडे, आदींनी अंत्यदर्शन घेतले.(प्रतिनिधी)