शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

कागलला पावसाचा तडाखा वादळी पावसाने झोडपले : मोठे नुकसान

By admin | Updated: May 19, 2014 00:52 IST

कागल : शहर आणि परिसराला काल, शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास वादळी वार्‍याने जोरदार तडाखा देत खासगी आणि सार्वजनिक मिळून लाखो

कागल : शहर आणि परिसराला काल, शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास वादळी वार्‍याने जोरदार तडाखा देत खासगी आणि सार्वजनिक मिळून लाखो रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान केले. सुदैवाने कोणती जीवितहानी झाली नसली तरी झाडा- फांद्यांवर आसरा घेणारे पक्षी मात्र या वादळी वार्‍याच्या तडाख्यात मोठ्या संख्येने घायाळ आणि मृत झाले आहेत. वीजपुरवठा खंडित होऊन हा परिसर अंधारात बुडाला. आंबा, चिकू, केळी या फळझाडांबरोबरच अनेक ठिकाणी उसाचे पीकही कोलमडले आहे. वीज वितरण कंपनीचे कर्मचारी व अधिकारी आज दिवसभर वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करीत होते. शनिवारी सायंकाळी सहा वाजता मुसळधार पाऊस कोसळला होता. त्यानंतर रात्री साडेदहा वाजता सोसाट्याचा वारा आणि विजा चमकू लागल्या. तब्बल तासभर हे वारे घोंघावत होते आणि अखंडपणे विजा चमकत होत्या. या वार्‍यामुळे अनेकांच्या घरांवरची कौले, पत्रे उडून गेले. बंगल्याच्या गॅलरीत बसविलेले ‘सोलर’ही कोलमडले. झाडांच्या फांद्या तुटल्यानेही नुकसान झाले. याच दरम्यान, अर्धा तास आडवा-तिडवा पाऊसही कोसळला. यामुळे आंबे, चिकू, केळीचे घड खाली पडून नुकसान झाले आहे. विद्युतपुरवठा करणार्‍या तारा तुटल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. वीज वितरण कार्यालयाने खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण वीजपुरवठा खंडित केला. सिद्धनेर्ली-कागल येथे ११ केव्ही उच्च दाबाची वाहिनी तुटून पडली. हे अंतर अर्धा किलोमीटर होते; तर लघुदाबाचे १८ विद्युत खांब आणि त्यांच्या वाहिन्या तुटून वीज कंपनीचे आठ ते नऊ लाखांचे नुकसान झाले आहे. खासगी व्यक्तींचे ३० ते ३५ हजार रुपये किमतीचे ‘सोलर’, पत्रे, कौले, झाडे आणि फळे-पिके यांचेही मोठे नुकसान झाल्याने महसूल विभागाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)