येथील राम मंदिरासमोर असलेल्या चौकात बॅ. खर्डेकर यांचा पुतळा आहे. या चौकास खर्डेकर चौक असे नामकरण यामुळे झाले आहे. पंचमुखी चौक ते खर्डेकर चौक आणि तेथून महामार्ग असा रस्ता रुंदीकरण झाल्याने हा पुतळा मागे घ्यावा लागणार आहे. तर श्रीमंत बाळ महाराज यांचा पुतळा बसस्थानकालगत आहे. या चौकातील रस्त्याची उंची वाढत गेल्याने पुतळा परिसर खाली आणि रस्ता वर अशी स्थिती होऊन पावसाचे पाणी साचत आहे. यावर उपाय म्हणून देखभाल दुरुस्तीसह परिसर सुशोभीकरण करण्यात येणार आहे, असे नगराध्यक्षा माणिक माळी सांगितले. दोन्ही ठिकाणी स्थानिक कार्यकर्ते सुनील माने, ज्येष्ठ नागरिक संघाचे शामराव पाटील, शिवाजी जाधव, संग्राम गुरव, मुजीब मुल्ला, लखन पालकर, शानूर पखाली आदी उपस्थित होते.
भारताचे शिक्षणमंत्री व्हा....
बॅ. बाळासाहेब खर्डेकर यांना तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी शिक्षणमंत्री म्हणून काम करा, असे सांगितले होते. मात्र, ती ऑफर नाकारून बॅ. खर्डेकरांनी येथील जयसिंगराव तलावालगत असलेल्या शाहू तंत्रनिकेतनच्या इमारतीत वास्तव्य करीत विद्यार्थी घडविण्याचे काम केले. कोल्हापूरचा पहिला खासदार त्यांच्या रूपाने कागलचा झाला.
फोटो कॅपशन
कागल येथील बसस्थानकासमोर असलेल्या श्रीमंत जयसिंगराव घाटगे यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण कामाचा शुभारंभ ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी मुख्याधिकारी पंडित पाटील, रमेश माळी, भय्या माने आदी उपस्थित होते.