शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

जोतिबावर आगीने भाविकांची घुसमट

By admin | Updated: April 3, 2015 01:05 IST

मंदिरालगत आग : एक तास थरार; स्थानिक यंत्रणा ठरली कुचकामी

कोल्हापूर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या चैत्र यात्रेच्या मुख्य दिवसाआधी गुरुवारी दर्शनासाठी आलेल्या भाविकांंची डोंगराला लागलेल्या आगीने घुसमट झाली. मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत प्रचंड धूर पोहोचल्याने भाविकांना प्रचंड त्रास झाला. मंदिरापासून हाकेच्या अंतरावर आग दुपारी दोनच्या सुमारास पोहोचली. अग्निशामक दलाचे जवान आणि पोलिसांनी आग त्वरित आटोक्यात आणली. यामुळे मोठा अनर्थ टळला. आग आटोक्यात आणण्यासाठी परिश्रम न घेता स्थानिक यंत्रणेने केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचे निदर्शनास आले.मंदिराभोवती असलेल्या खोल डोंगरकपारीत वाळलेले गवत, झाडेझुडपे आहेत. गुरुवारी बाराच्या सुमारास पश्चिमेकडील डोंगराला एका ठिकाणी अतिउत्साही भाविकाने आग लावली. दुपारी तळपते ऊन आणि सोसाट्याचा वारा असल्याने आग फैलावली. दोनच्या सुमारास मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यापासून हाकेच्या अंतरावर आग येऊन पोहोचली. मंदिराजवळच्या प्रकाश छत्रे यांच्या घराच्या छपराला आग लागली. सर्वत्र पळापळ सुरू झाली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस दाखल झाले. पाणी मारून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न करीत राहिले.