शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

नुसताच डांगोरा... कुठं हाय कर्जमाफी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 00:31 IST

कोल्हापूर-गगनबावडा 40 कि.मी. राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : रस्ते, पिण्याच्या पाण्याच्या योजना म्हणजे विकास नव्हे. पश्चिम ...

कोल्हापूर-गगनबावडा40 कि.मी.राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : रस्ते, पिण्याच्या पाण्याच्या योजना म्हणजे विकास नव्हे. पश्चिम पन्हाळा, गगनबावडा तालुक्याला मागासलेपणाचा डाग लागला आहे. तो पुसण्यासाठी स्वातंत्र्याच्या ७० वर्षांत एकही प्रयत्न झालेला नाही. शेतकरी व कष्टकऱ्यांच्या नशिबी केवळ घोषणाच येतात. कर्जमाफीचा डांगोरा पिटला जातो, पण कोठे आहे कर्जमाफी? असा संतप्त सूर मतदारांमधून उमटला.‘लोकमत’ प्रतिनिधीने कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर धावणाऱ्या एस.टी.तील प्रवाशांशी संवाद साधला. आसळजचे तुकाराम म्हेत्तर म्हणाले, कसली निवडणूक अन् काय राव. सरकारकडून कर्जमाफीचा नुसता डांगोरा पिटला जातोय. रोजगाराला गेल्याशिवाय पोटं भरत नाय. साळवणच्या जाईबाई पाटील यांना विचारण्याचा प्रयत्न केला असता, ‘सरकार काय देते हेच माहिती नाही, आम्हासनी सगळी सारखीच. दोन घास मिळालं पायजेत.’ एवढेच दबक्या आवाजात बोलल्या. एस.टी. गगनबावड्याच्या दिशेने धावत होती, उन्हाच्या झळा खिडकीतून आत येत असल्याने घामाघूम झालेले निवडेचे केरबा पाटील म्हणाले, ‘कोठे आहे कर्जमाफी, दोन हजाराने काय होते राव. सरकारचं काम बरं हाय, पण आमचा ईचार कोण करतंय.’ शिरोली एमआयडीसीला नोकरीला असलेला अणदूरचा तरुण रणजित पाटील म्हणाला, सरकारचे काम चांगले असले तरी गगनबावड्यात रोजगाराचा मोठा प्रश्न आहे. ‘मागास’ तालुका म्हणून किती वर्षे ठपका सहन करायचा, येथे मोठा प्रकल्प उभा राहिला, तर रोजगाराचा प्रश्न मिटेल.झुळूकही नाही...!मतदान पंधरा दिवसांवर येऊन ठेपले तरी या भागात निवडणुकीची झुळूकही पाहावयास मिळत नाही.कोण उमेदवार आहेत? सरकार कोणाचे यावे, असे वाटते? याबाबत बहुतांशी मतदार अनभिज्ञच दिसले.