शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

‘एसटीपी’साठी जयंतीचा उपसा बंद

By admin | Updated: February 13, 2015 00:45 IST

आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागांची बैठक महिनाभर दूषित पाणी पंचगंगेत मिसळणार,, प्रदूषणाची तीव्रता कमी करण्यासाठी विविध उपाय

कोल्हापूर : कसबा बावडा सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील (एसटीपी) शुद्ध झालेले पाणी वाहून नेणाऱ्या पाईपलाईनचे काम पूर्ण करण्यासाठी जयंती नाल्यातील दूषित पाण्याचा उपसा रविवार (दि. १५) पासून तीन आठवडे बंद करण्याचा निर्णय गुरुवारी आयुक्त पी. शिवशंकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. नाला थेट नदी सोडला जाणार असला तरी दूषित पाण्याची तीव्रता व व्याप्ती कमी करण्यात येणार आहे. तसेच नदी प्रवाहित करण्यासाठी राधानगरी धरणातून दररोज १०० ते १२५ क्युसेक जादा पाणी सोडण्यात येणार आहे. एसटीपी पूर्ण क्षमतेने सुरू करून पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी मार्गातील प्रमुख अडथळा दूर करण्याचे हे महत्त्वाचे पाऊल असल्याने सर्व घटकांनी यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन बैठकीत दिले.‘एसटीपी’तून प्रक्रिया होऊन बाहेर पडणारे पाणी नदीपर्यंत वाहून नेण्यासाठी दीड किलोमीटरची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. शेतातून जाणाऱ्या या पाईपलाईनच्या कामात वाहणाऱ्या पाण्यामुळे अडथळा येत आहे. उर्वरित ७५० मीटर पाईपलाईनचे काम पूर्ण करण्यासाठी जुना व नवा असे दोन्ही एसटीपी प्रकल्प पूर्णपणे बंद करावे लागणार आहेत. याबाबत तोडगा काढण्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला उपायुक्त विजय खोराटे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपविभागीय अधिकारी मनीष होळकर, पर्यावरणतज्ज्ञ उदय गायकवाड व दिलीप देसाई, पाटबंधारे विभाग, महापालिकेचा जल व ड्रेनेज विभागाचे अधिकारी उपस्थित होते.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १५ मार्चपर्यंत महापालिकेला कोणत्याही स्थितीत बावडा एसटीपी प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करावा लागणार आहे. जयंती नाला नदीत सोडल्याशिवाय पाईपलाईनचे काम पूर्ण होऊ शकत नाही. सर्व घटकांनी पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी थोडी कळ सोसून मदत करण्याचे आवाहन आयुक्त पी. शिवशंकर यांनी केले. यास एमपीसीबी, पाटबंधारे विभागासह सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी संमती दर्शविली. येत्या तीन आठवड्यांत पाईपलाईनचे तीन टप्प्यांत रात्रंदिवस काम करून पूर्ण करण्यात येणार आहे. यानंतर एसटीपी पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे ठरले.