शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

गूळ उत्पादकांवर आले तिहेरी संकट

By admin | Updated: July 16, 2014 01:00 IST

गुऱ्हाळघरांना कुलूप लावण्याचे संकेत : लोकप्रतिनिधींनो आता ब्रँड टिकवा

प्रकाश पाटील - कोपार्डेकोल्हापुरी गुळाबाबत शासनाने अलीकडचे घेतलेल्या तीन महत्त्वपूर्ण निर्णयामुळे तिहेरी संकट निर्माण झाले आहे. यात अडत पद्धत बंद, गुळाचे नियमन बंद व गुऱ्हाळघरांना अन्न व औषध प्रशासनाच्या प्रमाणपत्राची सक्ती, यामुळे गूळ उत्पादक व गुऱ्हाळघर मालकांनी या व्यवसायाकडे पाठ फिरवल्याची मानसिकता आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने सर्व गुऱ्हाळघरांना रितसर प्रमाणपत्र घेण्याचे परिपत्रक काढले आहे. यामुळे गुऱ्हाळघर मालकांत असंतोष पसरला आहे. वास्तविक या उद्योगाची कुटीर उद्योग म्हणून गणना होते. याशिवाय शेतीशी निगडित हा प्रक्रिया उद्योग असल्याने या उद्योगाचे ग्रामीण भागात केंद्रीकरण झाले आहे. त्याशिवाय या गूळ निर्मितीची शास्त्रीय नव्हे, तर परंपरागत पद्धत असल्याने आजपर्यंत गूळ निर्मितीला कोणाचीही हरकत नव्हती. मात्र, अलीकडेच अन्न व औषध प्रशासन विभागाची वक्रदृष्टी गूळ उत्पादक गुऱ्हाळघरांकडे वळली आहे. ज्या गुऱ्हाळघरांकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचे प्रमाणपत्र आहे, अशा गूळ उत्पादकांचाच फक्त गूळ व्यापाऱ्यांनी गूळ खरेदी करावा, असा फतवा काढल्याने गुऱ्हाळघर मालकांत असंतोष पसरला आहे.त्यातच शासनाने अडत पद्धत बंद करण्याचा घेतलेला निर्णयही शेतकऱ्यांसाठी घातक ठरणार आहे. बाजार समिती अस्तित्वात आल्यापासून गूळ विक्रीची त्रिस्तरीय पद्धत आहे. गूळ उत्पादक आपला गूळ अडत दुकानदारांकडे विक्रीसाठी पाठवित आहेत. अडत दुकानदार आपल्याकडे आलेला गूळ तीन टक्के अडत व्यवहारांवर तो व्यापाऱ्याला विकून त्याचे संपूर्ण पैसे गूळ उत्पादकांना वेळेवर देण्याची जबाबदारी पार पाडत होते. मात्र, अलीकडेच अडत बंद करण्याचा निर्णय घेतल्याने गूळ उत्पादक शेतकऱ्यांच्या पैशाला कोण जबाबदार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. गूळ हा नाशवंत माल असल्याने गूळ उत्पादकांना तो विक्रीबाबत अडत दुकानदार हा व्यापारी गूळ उत्पादकांतील दुवाच निखळल्याने मोठे संकट निर्माण झाले आहे.शेतीमालातून गुळाला वगळून शेती मालासाठी असणारे नियमन रद्द केल्याने गूळ उत्पादकाला आपला गूळ बाजार समितीतच विकण्याच्या अटीतून सुटका होऊन विक्रीचे स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, यामुळे गूळ उत्पादकांचे हक्काचे विक्री केंद्र गमवावे लागले आहे.