शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

जिगरबाज शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर कंपनीला नमविले

By admin | Updated: March 2, 2017 01:07 IST

सर्वोच्च न्यायालयात दिली झुंज : नुकसानभरपाई मिळाली ६७ लाख

विश्वास पाटील (कोल्हापूर) : ‘अन्याय झाला की त्याविरोधात संघर्ष करायचा’ हा कोल्हापूरच्या मातीचाच गुण आहे या गुणाचे प्रत्यंतर पुन्हा एकदा आले असून या जिल्'ातील नऊ शेतकऱ्यांनी एका बलाढ्य ट्रॅक्टर कंपनीबरोबर तब्बल वीस वर्षे संघर्ष करून आपल्या घामाचे दाम परत मिळविण्यात यश मिळविले. त्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले. त्यांची लढाई कोल्हापूरच्याच नव्हे, तर समस्त देशभरातील शेतकरीबांधवांना प्रेरणादायी आहे. या नऊ शेतकऱ्यांनी संबंधित कंपनीकडे २३ लाख रुपये १९९७ ला भरले होते. त्या बदल्यात कंपनीकडून व्याजासह ६७ लाख ४६ हजार ७०० रुपये त्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत.या खटल्याचा (केस क्रमांक ४५४२-४५५०/ २००८) निकाल सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मदन लोकूर व आदर्श गोयल यांनी दि. ६ डिसेंबर २०१६ ला दिला; परंतु शेतकऱ्यांना प्रत्यक्षात दि. ३० जानेवारी २०१७ ला डिमांड ड्राफ्ट पाठविण्यात आले. ते नुकतेच त्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. या खटल्यात कामेरी (ता. वाळवा) येथील अ‍ॅड. सचिन पाटील यांनी शेतकऱ्यांची बाजू नाममात्र मोबदल्यावर लावून धरली.घडले ते असे : कोल्हापूर जिल्ह्यातील शिवाजी तुकाराम पाटील (रा. तिटवे), पांडुरंग रामचंद्र आगळे (रा. सिद्धनेर्ली), आण्णासाहेब तातोबा मालगांवे (रा.भेंडवडे), पांडुरंग नागोजी पाटील (रा.चेंचेवाडी), हौसाबाई नारायण घाटगे (रा. वंदूर),चंद्रकांत बाबूराव जाधव (रा. शिये), नेमाण्णा बाळासाहेब वसकुटे (रा. चंदनकुड), पांडुरंग नामदेव दळवी (रा. मालेवाडी) आणि सुमन शिवाजी कदम (रा.मुरगूड) यांनी १९९७ ला साई ट्रॅक्टर कंपनी यांचे वितरक संजय बाळासाहेब पाटील (रा. जुने खेड) यांच्याकडे नऊ ट्रॅक्टरसाठी २३ लाख रुपये भरले; परंतु कंपनीकडून आलेले ट्रॅक्टर वितरक पाटील याने परस्पर दुसऱ्यांना विकले व तो पसार झाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर या शेतकऱ्यांनी कोल्हापुरात अ‍ॅड. सोळांकुरे यांच्या मदतीने ग्राहक न्यायालयात दाद मागितली. या न्यायालयाने २६ मे १९९८ ला ट्रॅक्टरसह नुकसानभरपाईपोटी प्रत्येकी दहा हजार रुपये द्यावेत, असा निर्णय दिला; परंतु कंपनीने मुंबई ग्राहक न्यायालयात त्यास आव्हान दिले. या न्यायालयात न्यायाधीश अमित बोरकर यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिला व हा दावा दाखल करून घेतानाच कंपनीने अगोदर प्रत्येकी शेतकऱ्याच्या नावावर प्रत्येकी एक लाख रुपये अनामत रक्कम भरावी, असा आदेश दिला. कंंपनीने या निकालास दिल्ली ग्राहक न्यायालयात आव्हान दिले. त्याचा निकाल २२ डिसेंबर २००७ ला लागला. शेतकऱ्यांनी कंपनी व वितरक एजंटावर खटला दाखल केला होता; परंतु दरम्यान एजंटाचा मृत्यू झाला. कंपनीने या निकालाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपिल केले. शेतकऱ्यांनी न्यायालयीन लढाई सोडून द्यावी, असाही हेतू त्यामागे होता; परंतू शेतकरी मागे सरले नाहीत. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात तब्बल दहा वर्षे झुंज दिली.शेट्टी यांच्यामुळे लढाईला बळ..कंपनीने सर्वोच्च न्यायालयात अपिल केल्यावर शेतकऱ्यांच्या पोटात गोळाच आला. कर्जाचे हप्ते आणि न्यायालयीन खर्च पेलताना जीव मेटाकुटीला आला. त्यामुळे आता काय करायचे, असा प्रश्न तयार झाल्यावर राजेंद्र मालगावे यांनी त्यांची खासदार राजू शेट्टी यांच्याशी भेट घडवून आणली. शेट्टी यांनी हा प्रश्न न्यायप्रविष्ट असल्याने मला राजकीयदृष्ट्या त्यात काही करता येणार नाही, परंतु तुम्ही जेवढ्या वेळेला त्याच्या तारखेसाठी दिल्लीत याल तेव्हा तुमच्या तेथील राहण्याची व जेवणाची व्यवस्था करतो, असे सांगितले. या देशातील न्यायव्यवस्था दुबळी नाही, ती तुम्हाला नक्कीच न्याय देईल. तुम्ही धीर सोडू नका, असा दिलासा दिल्यावर या शेतकऱ्यांनी पुन्हा कंबर कसली व न्याय मिळवूनच ते थांबले.तिघांचा मृत्यू..हा खटला सुरू असताना तिघांचा मृत्यू झाला. काही तर पैसे कधी मिळतील म्हणून झुरून मेले; परंतु अखेर न्याय मिळालाच व जेवढी रक्कम भरली होती त्याच्या तिप्पट मिळाली. जाट आंदोलनावेळी रेल्वे सेवा विस्कळीत झाली तेव्हा या खटल्यासाठी शेतकरी बेळगांवहून विमानाने दिल्लीला गेले परंतु माघार घेतली नाही.