शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

बेळगावच्या मराठा इन्फंट्रीत घडताहेत जिगरबाज कमांडो

By admin | Updated: March 4, 2017 01:17 IST

खडतर प्रशिक्षण : अधिकाऱ्यांनी उलगडला गौरवशाली इतिहास

बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर आणि कमांडो विंगला माध्यमांच्या प्रतिनिधींनी भेट देऊन कमांडो आणि जवानांना दिल्या जाणाऱ्या खडतर प्रशिक्षणाची माहिती घेतली. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर प्रवीण शिंदे आणि कमांडो विंगच्या अधिकाऱ्यांनी प्रशिक्षणाची माहिती देऊन मराठ्यांचा गौरवशाली इतिहास सांगितला.रिक्रूट म्हणून दाखल झालेल्या तरुणांना खडतर प्रशिक्षण देऊन परिपूर्ण सैनिक बनविण्याचे कार्य मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये केले जाते. तर ज्युनियर लीडर्स विंगच्या कमांडो विंग येथे मृत्यूवर मात करणाऱ्या कमांडोंचे प्रशिक्षण दिले जाते. जवान आणि कमांडो याना कशा पद्धतीचे कठीण प्रशिक्षण दिले जाते आणि प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांची देशसेवेसाठी केली जाणारी नियुक्ती याची माहिती जनतेला प्रसार माध्यमाद्वारे मिळावी म्हणून माध्यम प्रतिनिधींना मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटर आणि कमांडो विंग येथे निमंत्रित करण्यात आले होते. कमांडो विंगमध्ये साप हाताळणे, गोळीबार, अतिरेक्यांविरुद्ध कारवाई, शस्त्रास्त्रे, दारूगोळा हाताळणे, शत्रूच्या नजरेला न पडता आपले लक्ष्य साध्य करून सुखरूप परतणे, आदी कमांडोना दिले जाणारे प्रशिक्षण दाखविण्यात आले. मराठा सेंटरमध्ये ड्रिल, शस्त्रास्त्र हाताळणे, हेलिकॉप्टरमधून उतरून शत्रूच्या प्रदेशात कारवाई करून परत येणे, तसेच गोळीबार याबरोबरच तंदुरुस्तीसाठी दिले जाणारे एरोबिक्स, मल्लखांब यांची प्रात्यक्षिके मराठाच्या जवानांनी माध्यम प्रतिनिधीसमोर सादर केली. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे अधिकारी, प्रशिक्षक, कमांडो विंगचे अधिकारी, प्रशिक्षक यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती दिली. (प्रतिनिधी)सर्जिकल स्ट्राईक काय असते?हे जनतेने गेल्या काही दिवसांत ऐकल आहे. मात्र, शुक्रवारी ज्युनिअर लीडर्स विंगच्या कमांडोनी शत्रूच्या हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईक कशी केली जाते, याचे प्रात्यक्षिक दाखविले. पाकव्याप्त काश्मीरमधील सर्जिकल कारवाईत बेळगावमधील २१ पारा कमांडोनी सहभाग दर्शविला होता. देशातील सर्वांत ख्यातनाम असलेली घातक प्लाटून इथेच प्रशिक्षित केली जाते. ज्युनिअर लीडर्स विंग हे देशातील एकमेव कमांडो ट्रेनिंग सेंटर आहे. जिथे सर्व कमांडोंना प्रशिक्षण दिले जाते.