शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

जयंतराव, आॅक्टोबरमध्ये तुमचं खरं नाही राजू शेट्टी : विधानसभा निवडणुकीसाठी दिला इशारा

By admin | Updated: May 19, 2014 00:23 IST

इस्लामपूर : ‘जयंतराव, मी आता परमनंट खासदार झालो आहे. मी तुमचा राजीनामा मागणार नाही. येत्या तीन महिन्यांसाठी मंत्रीपदाचा उपभोग घ्या.

इस्लामपूर : ‘जयंतराव, मी आता परमनंट खासदार झालो आहे. मी तुमचा राजीनामा मागणार नाही. येत्या तीन महिन्यांसाठी मंत्रीपदाचा उपभोग घ्या. आॅक्टोबरमध्ये तुमचं काही खरं नाही’, अशा शब्दात खा. राजू शेट्टी यांनी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांना आव्हान दिले. येथील शासकीय विश्रामगृहावर खा. शेट्टी पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, २00९ च्या पहिल्या निवडणुकीत येडेमच्छिंद्र येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन केल्यानंतर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत लोकसभेत मराठी भाषेतूनच शेतकर्‍यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याची शपथ घेतली आहे. त्याप्रमाणे शेतकर्‍यांचे प्रश्न उपस्थित करुन ते मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. या निवडणुकीत राज्य व राष्ट्रीय स्तरावरील नेते तन-मन-धनाने माझ्या पराभवासाठी एकत्रित आले होते. निवडणूक लढवता येऊ नये म्हणून ऊस आंदोलनावेळी खून, वाटमारी, दरोडे असे गुन्हे दाखल केले. नुकसान भरपाईचा कायदा लावला. मात्र त्यांच्या या सगळ्या डावपेचानंतरही निवडणुकीचा मार्ग सुकर करुन घेतला. तडजोडीचे आरोप करीत राष्ट्रवादीच्या चमच्यांनी माझे पुतळे जाळले. मात्र माझा विचार ते जाळू शकत नाहीत. जनता हेच माझे सर्वोच्च न्यायालय आहे. माझा निर्णय जनतेनेच घ्यावा, अशी धारणा होती. १५ लाख रुपये घेऊन निवडणुकीत उतरलो. इतर खर्चासाठी जनतेला आवाहन केले आणि त्यांनी निवडणूक हातात घेतली. तेथेच माझा विजय निश्चित झाला. एरव्ही स्थानिक संस्थेपासून विधानसभेपर्यंत एकमेकांच्या विरोधात राहणारे काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते एकत्र आले. मात्र जनता माझ्या पाठीशी एकवटली. जनशक्ती काय करु शकते, हे त्यांनी दाखवून दिले. यापुढे राष्ट्रवादीचे तण उपटून काढण्याचा कार्यक्रम आहे. यावेळी बाबासाहेब सूर्यवंशी, प्रसाद पाटील, अभिजित पाटील, पृथ्वीराज पवार, बी. जी. पाटील, विलास रकटे, सयाजी मोरे, महेश पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)