शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
3
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
4
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
5
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
6
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
7
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
8
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
9
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
10
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
11
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
12
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
13
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
14
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
15
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
16
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
17
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
18
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
19
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
20
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
Daily Top 2Weekly Top 5

फरार कैदी जावीर नांदेडमध्ये गजाआड

By admin | Updated: April 3, 2015 01:12 IST

दोन साथीदारही अटकेत : पन्हाळ्यात पोलिसांच्या हातावर दिली होती तुरी

कोल्हापूर : पन्हाळा न्यायालयात साक्ष देण्यासाठी नेताना पोलिसांच्या डोळ््यांत चटणीपूड टाकून पळून गेलेला विजय ऊर्फ बबलू संजय जावीर (वय ३५, रा. कारंडे मळा शहापूर, इचलकरंजी) याच्यासह त्याचे साथीदार पिंटू जाधव व अंकुश गारड या तिघांना नांदेड येथे अटक केली. कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, आर्थिक गुन्हे शाखा व सायबर सेलच्या पथकाने नांदेड पोलिसांच्या मदतीने बुधवारी रात्री उशिरा ही कारवाई केली. गतवर्षी ८ डिसेंबरला जावीर हा दोन साथीदारांच्या मदतीने पळून जाण्यात यशस्वी झाला होता. या प्रकरणी त्यावेळी दोन कॉन्स्टेबलना निलंबित करण्यात आले होते.पोलिसांनी सांगितले की, कैदी विजय जावीर बिंदू चौक सबजेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. त्याने कोतोली (पान १० वर)कटाचा उलगडा आज होणारविजय जावीरला पसार करण्यासाठी त्यांनी प्लॅन कसा रचला. जावीर कारागृहात असताना त्यांची भेट, चर्चा कोठे झाली. पसार झाल्यानंतर ते कुठे गेले. नांदेडमध्येच राहण्याचा त्यांनी निर्णय का घेतला. गेली चार महिने ते काय काम करत होते. त्यांना यासाठी आणखी कोणी मदत केली, याची संपूर्ण माहिती पोलीस घेत आहेत. आज, शुक्रवारी या संपूर्ण कटाचा उलगडा होण्याची शक्यता आहे. नांदेडमध्ये अपार्टमेंटला चारही बाजूने सापळा रचून आवळल्या मुसक्याजावीर व त्याचे साथीदार नांदेड येथील शिवाजीनगर परिसरातील अपार्टमेंटमध्ये तिसऱ्या मजल्यावर भाड्याने राहत असल्याची माहिती खबऱ्याद्वारे पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी तत्काळ एक विशेष पथक नांदेडला रवाना केले. याठिकाणी स्थानिक पोलिसांच्या मदतीने अपार्टमेंटला चारही बाजूंनी घेरून जावीर राहत असलेल्या फ्लॅटमध्ये पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पोलिसांना पाहून त्याने व साथीदारांनी प्रतिकार करत पळून जाण्याचा प्रयत्न केला; परंतु बाहेर उभ्या असलेल्या पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. याठिकाणीच त्यांना खाकीचा प्रसाद दिला. त्यानंतर त्यांना गुरुवारी रात्री कोल्हापुरात आणले. पोलीस अधीक्षक डॉ. शर्मा यांच्यासमोर तिघांनाही उभे केले. जावीरचा साथीदार पिंटू जाधव हा सांगली येथील मोक्काच्या कारवाईमध्ये पसार होता. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे, तर अंकुश गारडने जावीर याला पळून जाण्यास मदत केल्याचे तपासात निष्पन्नझाले आहे.