शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

जनसुराज्यने पन्हाळगड राखला-- पन्हाळा जिल्हा परिषद विश्लेषण

By admin | Updated: February 24, 2017 21:48 IST

कोतोली गटात शिवसेनेचे अजित नरके यांचा पराभव आमदार चंद्रदीप नरके यांच्या जिव्हारी लागला.

नितीन भगवान --पन्हाळा तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीत जनसुराज्य पक्षाने अपेक्षित यश मिळविले असले, तरी भाजप व राष्ट्रवादीने आपले खाते उघडून आश्चर्याचा धक्का दिला आहे. जनसुराज्यची गेल्यावेळेपेक्षा संख्याबळ एकने कमी झाले. नरके-पाटील गटाची पिछेहाट झाल्याचे चित्र आहे. पन्हाळा पूर्व भागात कोडोली व सातवे येथे जनसुराज्य पक्षाने मुसंडी मारली असली, तरी सातवे गटातील विजय हा कमी मताधिक्याचा असून, तो विजय जनसुराज्य पक्षाला महत्त्वपूर्ण होता. कोडोली गटातील आतापर्यंतच्या निवडणुकीतील मताधिक्य पाहता हा विजय उच्चांकी मताचा आहे. वास्तविक अमरसिंह पाटील हे माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील यांचे सुपुत्र असल्याने त्यांनी सुरुवातीपासून सातवे गटात निवडणुकीची तयारी केली होती. सध्याचे जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे दावेदार ते होते. मात्र, विनय कोरे यांनी या गटात विशेष लक्ष देऊन पाटील गटाचे राजकारण संपुष्टात आणले. पोर्ले तर्फे ठाणे गटात प्रियांका पाटील ह्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीत असताना चुलते बाबासाहेब पाटील (आसुर्लेकर) यांनी त्यांना राजकारणात आणून आपल्या पराभवाचा वचपा काढला. यवलूज गटात भारतीय जनता पक्ष व जनसुराज्य यांची मैत्रिपूर्ण लढत झाली. यामध्ये कल्पना केरबा चौगुले ह्या भाजपच्या उमेदवार विजयी होऊन गेल्या निवडणुकीतील पती केरबा चौगुले यांच्या पराभवाचा ठपका दूर केला. याठिकाणी जनसुराज्यने आपला उमेदवार उभा करणे भाजपला अपेक्षित नव्हते. ही लढत मैत्रिपूर्ण होती का? हा प्रश्न अनुत्तरीत राहिला.कोतोली व कळे हे दोन्ही गट शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जात होता. गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले होते; पण यावेळी कळे गटात शिवसेनेचे विजयी उमेदवार सर्जेराव पाटील यांचे मताधिक्य पाहता सेनेच्या मताधिक्यात घट झाली असल्याचे चित्र आहे. यावरून आमदार चंद्रदीप नरके यांचे वर्चस्व कमी झाल्याचे दिसून येते. कोतोली गटात शिवसेनेचे अजित नरके यांचा पराभव आमदार चंद्रदीप नरके यांच्या जिव्हारी लागला.