शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जनार्दन भोसलेंनी केली पाच हजार वृक्षलागवड

By admin | Updated: June 13, 2017 00:28 IST

१७ वर्षांचा प्रवास; पर्यावरणरक्षणाचा वसा--आम्ही जगवली झाडे..!

भरत बुटाले ।  लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : आज ती झाडे डौलाने मुळं घट्ट करून उभी आहेत. सुमारे २० ते २५ फूट उंच असतील. अनेकदृष्टीने फायदेशीर ठरणारी झाडे पर्यावरणरक्षणाचेही कार्य करीत आहेत. टाकाळा परिसरात राहणाऱ्या जनार्दन भोसले यांनी १९९९ मध्ये पंढरपुरात विठ्ठलचरणी वृक्षारोपणाचा संकल्प केला होता. त्यावेळेपासून आजपर्यंत सुमारे चार ते पाच हजार झाडे त्यांनी लावून जास्तीत जास्त झाडांचे संगोपन केले आहे. प्रवासी वाहतूक व्यावसायिक भोसले हे पंढरपूर भागात दर्शनाला गेल्यावर तेथे पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष अनुभवाला आले. तिथेच त्यांनी वृक्षारोपणाचा संकल्प सोडला आणि टाकाळा परिसरात झाडे लावण्यास सुरुवात केली. स्वखर्चातून झाडे आणायची, योग्य जागा पाहून तिथं ती लावायची, त्याच्या खत-पाण्याची व्यवस्था करायची आणि शक्य तेवढे त्यांचे संगोपन करायचे, असा त्यांचा हा उपक्रम. अल्प शिक्षण आणि अगदी सामान्य परिस्थिती असूनसुद्धा त्यांनी १७ वर्षांपूर्वी केलेला हा संकल्प अनेक ठिकाणी लावलेल्या वृक्षराजीच्या रूपाने फळास आला आहे.त्यांनी आजपर्यंत रेन ट्री, कॅशिओ, गुलमोहर, लिंब, आंबा, फणस, करंजी, फॅटोडिया, कदंबा, डालचिनी, चिकू, नारळ या झाडांबरोबर औषधी झाडेही लावलेली आहेत. झाडांना ट्री गार्ड लावून त्याचे संरक्षण करणाऱ्या जनार्दन भोसले यांना त्यांच्या मित्रपरिवाराने ‘वृक्षमित्र’ उपाधी बहाल केली आहे. टाकाळा, पांजरपोळ, उजळाईवाडी, कागल पंचतारांकित एमआयडीसी, निपाणी बसस्टँड, आदी अनेक परिसरात त्यांनी लावलेली झाडे डौलाने उभी आहेत. त्यांच्या या संकल्पाला अनेकांनी हातभार लावला आहे. वैयक्तिक, संस्था तसेच जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांच्या हस्ते झालेला गौरव हीच त्यांच्या कार्याची पोचपावती आहे.प्रत्येकाने एकतरी झाड लावावे आणि त्याला आपल्या मुलाप्रमाणे जपावे, असे नेहमीच वाटते. याची फळे पुढच्या पिढीला नक्कीच मिळतील. नाही तर पुढची पिढी, निसर्ग आपल्याला कदापिही माफ करणार नाही. - जनार्दन भोसले, वृक्षमित्र, टाकाळा, कोल्हापूर.कोल्हापुरातील टाकाळा येथील विद्यालंकार क्लासेसच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रा. शिवाजी सावंत, जनार्दन भोसले, रोहन शिर्के, डॉ. सुरज पोवार, रवी चव्हाण, आदी उपस्थित होते.