शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

आता महाविद्यालयांत घुमणार ‘जन गन मन....

By admin | Updated: July 20, 2014 00:09 IST

उच्च शिक्षणचे सर्व विद्यापीठांना पत्र : प्राचार्य व विद्यार्थी संघटनांमधून निर्णयाचे स्वागत

कोल्हापूर : ‘जन गण मन...’ हे राष्ट्रगीत आता सर्व महाविद्यालयांत घुमणार आहे. महाविद्यालयांत राष्ट्रगीत सुरू करण्याबाबतचे पत्र उच्च व तंत्रशिक्षण विभागाने राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलसचिव आणि शिक्षण संचालकांना पाठविले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच होणार असून, या निर्णयाचे सर्व स्तरावर स्वागत करण्यात येत असून, राष्ट्रप्रेम व राष्ट्रभक्ती वाढण्यास यामुळे नक्कीच उपयुक्त ठरेल, असे मत विविध महाविद्यालयांतील प्राचार्य व विद्यार्थी संघटनांमधून व्यक्त होत आहे. राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शाळा सुरू होण्यापूर्वी प्रार्थनेसोबत राष्ट्रगीत म्हटले जाते. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम व देशभक्तीची भावना निर्माण होते. हीच भावना तरुण पिढीमध्ये जागृत करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने राष्ट्रगीत म्हणण्याचा निर्णय घेतला असून, लवकरच त्याची अंमलबजावणी होणार आहे. शासनाच्या या निर्णयाचे स्वागत आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम वाढण्यासाठी मदत होणार आहे. तसेच महाविद्यालय सुरू होताना पहिल्यांदा राष्ट्रगीत होणार आहे. त्यानंतर महाविद्यालय सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांना वेळेत येण्याची सवय लागणार आहे. यातून देशप्रेम, बंधुप्रेम आणि सामाजिक कार्य करण्यासाठी त्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल. - प्राचार्य एस. बी. कणसे,महावीर महाविद्यालय पहिली ते दहावीपर्यंतच्या शाळांमध्ये प्रार्थनेसोबत राष्ट्रगीत घेतले जाते. आता महाविद्यालयांतही राष्ट्रगीत म्हटले जाणार आहे. त्यामुळे शाळांतील जुन्या आठवणींना उजाळा तर मिळणार आहे. पण त्यासोबतच देशाबद्दल युवक-युवतीमध्ये आणखी देशप्रेम वाढणार आहे. - भारत घोडके, अध्यक्ष, एनएसयुआयराष्ट्रगीत सक्तीबाबत विद्यापीठास शासनाचे परिपत्रक मिळाले आहे. याबाबत शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळाच्यावतीने विद्यापीठाशी संलग्नित २८० महाविद्यालयांना परिपत्रक काढण्यात आले आहे. महाविद्यालयांनी कार्यवाहीबाबतचा अहवाल विद्यापीठाला पाठवावा लागणार आहे. त्यामुळे व्यवस्थापन परिषदेपुढे या बाबात विषय ठेवण्यात आला आहे. त्यामुळे व्यवस्थापन परिषदेमध्ये याबाबत चर्चा होवू यांची अमंलबजावाणी करण्यात येणार आहे. - डॉ. डी. के. गायकवाड, संचालक, विद्यार्थी कल्याण मंडळशासनाने प्रत्येक महाविद्यालयांत राष्ट्रगीत म्हणणे सक्तीचे केले आहे. ही खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे. विद्यार्थ्यांची दररोज महाविद्यालयातील सुरुवात एका चांगल्या विचाराने होणार आहे. यामुळे त्यांच्यामध्ये देशप्रेम तर निर्माण होईलच, पण त्यासोबत त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासामध्ये नक्कीच वाढ होणार आहे. - प्राचार्य डॉ. के. एस. नलवडे, राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज शासनाचा हा निर्णय चांगला आहे. देशभक्ती कमी होत चालेली होती,या निर्णयामुळे देशभक्ती वाढण्यासाठी आणि युवकांच्या मध्ये एकता वाढण्यास उपयुक्त ठरणार आहे. या निर्णयांचे आम्ही स्वागत करतो. - चेतन शिंदे, जिल्हाप्रमुख, भारतीय विद्यार्थी सेना