शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

‘जमाना फास्ट, कवितांमध्ये हास्यांचे ब्लास्ट’

By admin | Updated: December 16, 2014 00:42 IST

नायगांवकर काव्यमैफल : सी. जी. कुलकर्णी वाङमय व्याखानमाला

कोल्हापूर : जमाना फास्ट झाला, लग्नेसुद्धा कॅज्युअल लिव्ह घेऊन रविवारी होऊ लागली. टी.व्ही.वरील सिरीयलच्या नादात आमच्यासारख्या व्हीआरएस घेतलेल्यांचे घरातील मूल्य झिरोवर आले. आमचे फादर अशोक नायगांवकर अन् आलीया भोगासी असावे सादर अशी टिप्पणी माझ्या मुलीच करू लागल्या.. टॉवेल मागताच तुमचा हात मुरगळला काय, असे विचारू लागल्या. किचनमधले हस्तक्षेपही अंगलट आले. अन् या सर्व अनुभवांतूनच माझ्या कविता घडू लागल्या... या शब्दांत आपला काव्य प्रवास ज्येष्ठ कवी अशोक नायगांवकर यांनी मांडला. स्त्री आणि पुरुष यांच्या स्वभावाची तुलना किचनचा संदर्भ देत भाष्य करणाऱ्या कविता सादर करत उपस्थित रसिकांना हसवले. निमित्त होत कोल्हापूर येथील राम गणेश गडकरी हॉलमध्ये आज, सोमवारी सी. जी. कुलकर्णी वाङ्मय मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या १२ व्या व्याखानमालेचे.मुंबई येथील मराठी माणसांची व्यथा व्यक्त करताना लोकमान्य टिळकांवरील टिळक तुम्ही चौपाटीवर कशासाठी उभे आहात, पाणीपुरी, भेळ खाणे हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे... या कवितेने या काव्यमैफ लीला प्रारंभ झाला. स्वानुभव, स्त्री-पुरुष स्वभावातील मूलभूत फरक आणि सांस्कृतिक आणि भौतिक बदलांचा समाजावर विशेषत: कुटुंबव्यवस्थेवर झालेला परिणाम, स्वेच्छानिवृत्तीनंतर घरातूनच मिळणारी सापत्न वागणूक अन् भारतीय कुटुंबव्यवस्था यावर नायगांवकरांनी मार्मिक कविता सादर करत हास्यसभाच घडवून आणली. हल्ली साबणाच्या जाहिरातींमध्ये होणाऱ्या मॉडेलचा वापर सांगताना नायगावकर म्हणाले, हल्ली टी.व्ही.वर सकाळी, संध्याकाळी फे सच फ ेस दिसून येतो. पुरुषांच्या जाहिरातीमध्ये मात्र जंतूनाशक साबणच दाखवले जातात.स्त्री ही कोमल हृदयाची असली तरी भाजीसोबतचा तिचा व्यवहार हिंसाचारी असतो, हे व्यक्त करणारी ‘भर बाजारात कांद्यावर सपासप वार होतोय.. तिखटं टाकलं जातंय भाजीच्या डोळ्यांवर’ ही कविता नायगांवकरानी सादर करताच, गडकरी हॉलमध्ये हास्याचे फवारे उडाले. कवितांच्या जोडीनेच टी.व्ही.वरील मालिका पाहण्याचा त्याग करून आपल्या कार्यक्रमास उपस्थिती लावल्यामुळे मी तुमचा आभारी आहे, अशी मार्मिक टिप्पणीही नायगावकरानी यावेळी केली. प्रारंभी दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष विनोदकुमार लोहिया यांनी प्रास्ताविक केले. चित्रा कशाळकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. शीतल धर्माधिकारी यांनी पसायदान सादर केले. सूत्रसंचालन प्रा. स्नेहा फ डणीस यांनी केले तर प्रा. पी. एस. हेरवाडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)आधुनिक पती आणि पत्नी....चूल आणि मूल हे विश्व असणारी महिला आता मात्र नोकरी करत आहे. नोकरी करणाऱ्या आपल्या पत्नीकडे पुरुषाचा दृष्टिकोन व्यक्त करताना नायगांवकरांनी ‘भाज तव्यावर भाज चपात्या अनंत, असू दे तुझी नोकरी, देव करो अन टीएही वाढो, तू तर फक्कड मासिक हुंडा .. बापाने काय द्यावे...’ ही कविता सादर करताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. ‘निवृत्त लोकांचे बघा काय हाल झाले, काही पिण्यास गेले, काही पुण्यात गेले’ ही कविता सादर केली.