शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना उपाययोजनांसाठी जयसिंगपूर पालिका सरसावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:28 IST

जयसिंगपूर : शहरातील वाढती कोरोनाबाधितांची संख्या पाहता, नगरपालिका व पोलीस प्रशासनाकडून कडक नियम अंमलबजावणी केली जात आहे. शहरातील प्राथमिक ...

जयसिंगपूर : शहरातील वाढती कोरोनाबाधितांची संख्या पाहता, नगरपालिका व पोलीस प्रशासनाकडून कडक नियम अंमलबजावणी केली जात आहे. शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्राकडूनही तीन ठिकाणी लसीकरण केले जात आहे, तर विनाकारण फिरणाऱ्यांबरोबरच फळे, भाजी विक्रेत्यांची रॅपिड अ‍ॅन्टिजेन तपासणी करण्याची मोहीम सुरू आहे.

शहरात कोरोनाबाधितांची संख्या शंभरावर पोहोचली आहे. दररोज दहा ते पंधरा नागरिक बाधित होत आहेत. पालिका प्रशासनाकडून ध्वनिक्षेपकाद्वारे नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. सकाळी सात ते अकरा या वेळेत अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. मात्र, उपनगरांतील काही व्यावसायिक उशिरापर्यंत दुकाने सुरू ठेवत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

शहरातील नववी ते तेरावी गल्ली परिसरात दैनंदिन बाजार भरत असल्याने गर्दी होत होती. त्यामुळे यावर उपाययोजना म्हणून पालिका प्रशासनाने तातडीने हा परिसर बॅरिकेट्‌स लावून सीलबंद केला आहे. फिरून भाजी विक्री करण्याच्या सूचना विक्रेत्यांना दिल्या असून त्यांच्यावर पालिका कर्मचाऱ्यांचा वॉच आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता पालिकेने शहरात विनाकारण फिरणाऱ्यांबरोबरच भाजी व फळे विक्रेत्यांची रॅपिड अ‍ॅन्टिजेन तपासणी मोहीम सुरू केली आहे. पहिल्या दिवशी विनाकारण फिरणाऱ्या नऊपैकी एक तरुण पॉझिटिव्ह निघाला, तर गुरुवारी दुसऱ्या दिवशी महात्मा फुले भाजी मंडईत साठ भाजी विक्रेत्यांची अ‍ॅन्टिजेन तपासणी करण्यात आली. सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला. मात्र, विनाकारण फिरणाऱ्या एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

नगराध्यक्षा डॉ. नीता माने, उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, मुख्याधिकारी टीना गवळी, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या रोखण्यासाठी उपाययोजना राबवत आहेत. याला कर्मचाऱ्यांचेही चांगले सहकार्य मिळत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडुरंग खटावकर यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण यंत्रणा देखील चांगल्या प्रकारे सुरू आहे.