शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

‘रिंगण’मधून अंधश्रध्दा निर्मूलनाचा जागर

By admin | Updated: September 21, 2014 00:53 IST

अंनिसचा उपक्रम : कोल्हापूरसह पुणे, सिंंधुदुर्ग, इस्लामपूर येथील

कोल्हापूर : अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला तेरा महिने उलटले तरी खुनी सापडलेले नाहीत. तरीही त्यांचे अंधश्रध्दा निर्मूलनाचे विचार संपलेले नाहीत ते पुढे नेण्याचे काम ‘अंनिस’तर्फे सुरु आहे. याचाच एक भाग म्हणून रिंगण नाट्याच्या माध्यमातून आज, शनिवारी अंधश्रध्दा निर्मूलनाचा जागर करण्यात आला. कोल्हापूरसह पुणे, सिंधुदुर्ग, इस्लामपूर येथील गटांनी अंधश्रध्देशी निगडीत नाटक सादर केले.महावीर महाविद्यालयात आचार्य विद्यानंद सांस्कृतिक भवनात ‘अंनिस’तर्फे रिंगण नाट्य सादर झाले. त्याचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. एन. जे. पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी पोलिस अधिक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा, शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. अशोक भोईटे,‘अंनिस’चे सरचिटणीस हमीद दाभोलकर, संजय बनसोडे, कार्याध्यक्ष अविनाश पाटील, योगेश कुदळे, प्राचार्य डॉ. एस. बी. कणसे, विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अभयकुमार साळुंखे आदी उपस्थित होते.यावेळी हमीद दाभोलकर, डॉ. मनोजकुमार शर्मा यांची भाषणे झाली. इस्लामपूर गटाने ‘सॉक्रेटीस ते दाभोलकर व्हाया तुकाराम’ हे नाटक सादर करुन सॉक्रेटीस, संत तुकाराम व डॉ. दाभोलकर यांच्या सत्य विचाराला त्या त्या काळात दडपण्याचा प्रयत्न झाल्याचे चित्र मांडले. त्यानंतर इचलकरंजीच्या गटाने ‘आंतरधर्मीय विवाह’ या माध्यमातून हिंदू व मुस्लिम समाजातील तरुण तरुणीच्या विवाहामुळे झालेल्या विरोधाचे चित्र मांडले. कोल्हापूर गटाने ‘रुईचे लग्न’ मधून अविवाहित मुलांच्या मृत्युनंतर त्यांचा रुईच्या झाडाशी लावणाऱ्या विवाहास विरोध करणाऱ्या तरुणांचे वास्तव समोर आणले. सिंधुदुर्ग-शिरगाव गटाने ‘भयमुक्त चित्त जेथे’ या नाटकातून लहान मुलांच्या मनातील भूत पिशाच्चाची भिती घरातील सुजणा व्यक्ती दूर करुन त्यांना आधार देणारे चित्र समोर आणले. यानंतर पुणे गटाने ‘ऐसे कैसे झालेभोंदू’ हे बुवाबाजीचा भांडा फोड करुन शहरातील उजळ माथ्याने होत असलेली अंधश्रध्दा मांडली. कोल्हापूरच्या दुसऱ्या गटाने ‘न्याय हवा न्याय’ या माध्यमातून तेरा महिने उलटले तरी अद्याप दाभोलकरांचे मारे करी सापडत नाहीत. याबद्दल शासनाकडे न्याय मागणारी चतुसुत्री मांडण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)