शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘आयटीआय’च्या अर्जनिश्चितीचा वेग वाढला

By admin | Updated: July 1, 2016 00:18 IST

अकरावीची गुणवत्ता यादी आज प्रसिद्ध : उद्यापासून प्रत्यक्ष प्रवेशाची कार्यवाही --मिशन अ‍ॅडमिशन

कोल्हापूर : अकरावी प्र्रवेश प्रक्रियेअंतर्गत संकलित झालेल्या अर्जांची छाननी व गुणवत्ता यादी बनविण्याची प्रक्रिया पूर्ण झालआहे. आज, शुक्रवारी दुपारी तीन वाजता गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. उद्या, शनिवारपासून प्रत्यक्ष प्रवेशाची कार्यवाही सुरू होईल. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) अर्जनिश्चितीचा वेग वाढला आहे.शहरातील ३२ महाविद्यालयांतील अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीकडे एकूण १३४०० जागांसाठी १३८६० अर्ज दाखल झाले आहेत. समितीकडे दाखल झालेल्या अर्जांची छाननी आणि गुणवत्ता यादी तयार करण्याची प्रक्रिया गुरुवारी पूर्ण झाली. या यादीची प्रसिद्धी आज, शुक्रवारी दुपारी तीन वाजता शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या ६६६.८िीि‘ङ्मस्र.ङ्म१ॅ या संकेतस्थळासह सर्व महाविद्यालयांमध्ये प्रसिद्धी केली जाणार आहे. गुणवत्ता यादीनुसार उद्या, शनिवारपासून गुरुवार (दि. ७ जुलै)पर्यंत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेश देण्याची कार्यवाही होईल. यातील रिक्त जागांवर महाविद्यालयीन पातळीवर विद्यार्थ्यांना ८ आणि ९ जुलैला प्रवेश दिला जाईल. महाविद्यालयांतील अकरावीचे वर्ग ११ जुलैपासून सुरू होतील. दरम्यान, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचा सर्व्हर योग्यपणे व क्षमतेने कार्यरत झाल्याने कोल्हापुरातील ‘आयटीआय’कडील अर्जनिश्चितीचा वेग वाढला आहे. गुरुवारी ४०७ अर्ज निश्चित झाले. ‘अ‍ॅप’वर समजणार महाविद्यालयगुणवता यादीची माहिती प्रवेश प्रक्रिया समितीद्वारे ‘ङ्म’ँंस्र४१ 11३ँ अे्रि२२्रङ्मल्ल या मोबाईल अ‍ॅपवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी अ‍ॅपवर गुणवत्ता यादीच्या पर्यायामध्ये अर्जाचा क्रमांक नमूद केल्यानंतर त्याला प्रवेशासाठी मिळालेल्या महाविद्यालयाचे नाव समजणार असल्याचे प्रवेश प्रक्रिया समितीचे कार्याध्यक्ष डॉ. वसंत हेळवी यांनी सांगितले.तंत्रनिकेतनसाठी अर्ज करण्याची मुदत वाढलीशासकीय आणि खासगी तंत्रनिकेतनमधील प्रथम वर्ष पदविकेच्या प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत तंत्रशिक्षण संचालनालयाने वाढविली असून, सोमवारपर्यंत (दि. ४) अर्ज करता येणार आहेत. शासकीय तंत्रनिकेतनमधील सुविधा केंद्रातून गुरुवारअखेर प्रथम वर्ष पदविकांसाठी खुल्या व आरक्षित प्रवर्गातील ९७० अर्जांची, तर थेट द्वितीय वर्षासाठी २९४ अर्जांची विक्री झाली आहे. थेट द्वितीय वर्ष पदविका अभ्यासक्रमासाठी आॅनलाईन अर्ज करण्याची मुदत उद्या, शनिवारपर्यंत आहे.