शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मारेकरी सापडत नाहीत हेच खेदजनक

By admin | Updated: April 15, 2015 00:41 IST

उमा पानसरे यांचा उद्वेग : हल्ल्याला दोन महिने पूर्ण

 कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याला उद्या, गुरुवारी दोन महिने पूर्ण होत आहेत. तरीही हत्येचे गूढ उकलण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. राज्याची संपूर्ण पोलीस यंत्रणा तपास करीत असताना मारेकरी सापडत नाहीत, याची खंत वाटते, अशी उद्विग्नता त्यांच्या पत्नी श्रीमती उमा पानसरे यांनी मंगळवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. पानसरे दाम्पत्य १६ फेब्रुवारीला सकाळी फिरायला गेल्यानंतर त्यांच्यावर राहत्या घरापासून काही अंतरावरच हल्लेखोरांनी गोळीबार केला. त्यामध्ये गोविंद पानसरे यांची हत्या झाली. ही हत्या सामाजिक, राजकीय, कौटुंबिक, वैयक्तिक किंवा आर्थिक व्यवहारातून झाली आहे का, अशी शक्यता गृहीत धरून त्या अनुषंगाने पोलिसांनी सर्व पातळ्यांवर माहिती घेतली. तथापि, या संदर्भात पोलिसांना कोणतेही धागेदोरे हाती लागलेले नाहीत. प्रत्यक्ष घटनास्थळावरील साक्षीदार उमा पानसरे यांच्याकडून तपास अधिकारी अंकित गोयल यांनी माहिती घेण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांच्याकडूनही अद्याप पूर्णत: माहिती प्राप्त झालेली नाही. उमा पानसरे यांना जितके आठवेल तितकी माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी काही गुन्हेगारांचे फोटो त्यांना दाखविले; परंतु ते त्यांना ओळखता आले नाहीत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्या सेवेला मुलगी स्मिता पानसरे आहेत. त्यांच्या बंगल्याभोवती आजही सशस्त्र पोलीस बंदोबस्त आहे. पानसरे यांच्यावरील हल्ल्याला उद्या दोन महिने पूर्ण होत आहेत. या हत्येचा तपास लागलाच पाहिजे; परंतु पोलिसांना अद्यापही मारेकरी सापडलेले नाहीत, ही मनाला खंत वाटते, अशी उद्विग्नता उमा पानसरे यांनी व्यक्त केली. पानसरे हत्येच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आतापर्यंत एक लाखापेक्षा जास्त फोन कॉल्सची चौकशी केली. सराईत गुन्हेगार, राजकीय व सामाजिक क्षेत्रांतील व्यक्ती, नातेवाईक, आदींसह सुमारे ६०० लोकांचे जबाब घेतले. चार संशयास्पद दुचाकी जप्त केल्या आहेत. राज्यभरातील २५ विशेष पथके याप्रकरणी मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास पोलीस कसोशीने करीत असताना गेल्या दोन महिन्यांत त्यांना कोणताच पुरावा मिळू शकलेला नाही. इतर खुनासारख्या गुन्ह्यांमध्ये एकही पुरावा नसतानाही पोलीस मारेकऱ्यांना शोधून काढतात. मग पानसरे यांच्या हत्येचे मारेकरी त्यांना का सापडत नाहीत...? याचे आम्हाला कोडे पडले आहे असे स्मिता पानसरे म्हणाल्या. तर पानसरे यांच्या हल्ल्याला दोन महिने पूर्ण होत असले तरी आमचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. आम्हाला खात्री आहे की, लवकरच आम्ही या प्रकरणाचा छडा लावू. असे अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी सांगितले. (प्रतिनिधी)