शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

परस्पर सहकार्याने शहराची वाहतूक कोंडी फोडणे शक्य

By admin | Updated: February 14, 2015 00:06 IST

मनोजकुमार शर्मा : महापालिकेत ‘कोल्हापूर सेफ सिटी’चे सादरीकरण

कोल्हापूर : महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींनी सहकार्य केल्यास शहरातील वाहतुकीची कोंडी पोलीस प्रशासन फोडू शकते. शहरातील मैदाने व शाळांच्या जागेत पे-पार्क करणे, एकेरी वाहतुकीसह पार्किंग व्यवस्था नसलेल्या रुग्णालये व मंगल कार्यालयांचा परवाना रद्द करणे, आदी कठोर उपायांची गरज असल्याचे मत पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी शुक्रवारी महापालिकेत झालेल्या बैठकीत व्यक्त केले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आयुक्त पी. शिवशंकर व स्थायी समितीचे सभापती आदिल फरास होते.महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात ‘कोल्हापूर सेफ सिटी’ या प्रकल्पाचे सादरीकरण झाले. माजी पोलीस महासंचालक डी. शिवानंद यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या ‘एमआयपीएल’ या संस्थेने शहरातील चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून शहर सुरक्षित करण्याबाबतचा पाच कोटी रुपयांचा प्रकल्प महापालिकेस सादर केला. यावेळी उपमहापौर मोहन गोंजारे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त विजय खोराटे, नगररचना सहसंचालक डी. एस. खोत, आदींसह सर्व विभागांचे अधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.शहरातील पार्किंग व्यवस्थेचा पूर्ण बोजवारा उडाला आहे. किमान अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी तरी येथील सोयीबाबत समाधान व्यक्त केले पाहिजे, अशी व्यवस्था करणे गरजेचे आहे. शिवाजी स्टेडियम, दसरा चौक, सासने मैदान, आदींच्या बाहेरील रिकामा भाग, काही मोठ्या शाळांच्या मैदानांचा थोडा भाग पे-पार्कसाठी वापरण्याच्या पर्यायावर विचार होणे गरजेचे आहे. महापालिकेने पोलीस प्रशासनासोबत दर दोन महिन्यांनी आढावा बैठक घ्यावी, अशी सूचना डॉ. शर्मा यांनी मांडली. पोलीसांच्या सर्व प्रयत्नांना महापालिका प्रशासन सर्वतोपरी मदत करील, असे आश्वासन आदिल फरास व राजेश लाटकर यांनी दिले.महापौरांची अनुपस्थितीप्रकल्प सादरीकरणासाठी महापौर तृप्ती माळवी यांना निमंत्रित करूनही त्या अनुपस्थित राहिल्या. सोमवारी(दि. १६)ला राजीनाम्याबाबत सभा होत आहे. या सभेला त्या येतील किंवा नाही याबाबत बैठकीत कुजबुज सुरू होती.सेफ सिटीचे फायदेवाहतूक नियंत्रणगुन्हेगारी नियंत्रणपर्यटकांना सुविधा देणेनागरिकांना सुरक्षेची खात्रीस्मार्ट सिटीच्या दृष्टीने पहिले पाऊलअसा आहे सेफ सिटी प्रोजेक्टफ ायबर आॅप्टिकलद्वारे अत्याधुनिक कॅमेरे महत्त्वाच्या चौकांत बसणारहे कॅमेरे चेहरापट्टी ओळखण्याइतपत तंत्रयुक्त असतील१८० अंशांतील चित्र रेकॉर्ड होणारया सर्वांचे नियंत्रण पोलीस मुख्यालयात असेल