शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

गगनबावड्यात सतेज पाटील यांची भूमिका ठरणार महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 00:09 IST

चंद्रकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क गगनबावडा : कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून २०१४ मध्ये निवडून आलेले राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार ...

चंद्रकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कगगनबावडा : कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून २०१४ मध्ये निवडून आलेले राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक या भागाचे नेतृत्व करत आहेत. त्यांना या तालुक्यातून मताधिक्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यांच्याविरुद्ध मोट बांधण्यासाठी मतदारसंघात विरोधकांकडून व्यूहरचना आखली जात असून, पडद्याआडच्या हालचाली येत्या काही दिवसांत गतिमान होणार आहेत.गगनबावडा तालुक्यावर गेल्या काही वर्षांपासून डॉ. डी. वाय. पाटील सह. साखर कारखान्याचे चेअरमन आ. सतेज पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. या वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी महाडिक यांच्या ताराराणी आघाडीकडून जि. प., पं. स. निवडणुकीवेळी प्रयत्न झाला.गगनबावडा तालुक्यातील जि.प.चे दोन्ही व पं.स. चार पैकी तीन मतदारसंघात आ. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे वर्चस्व आहे. तर पं.स.च्या एका मतदारसंघात भाजपचे वर्चस्व असल्याचे मानले जात आहे. पी. जी. शिंदे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केल्याने तालुक्यात भाजपला पाठबळ मिळाले आहे. भाजप जिल्हा ग्रामीणचे उपाध्यक्ष नंदकुमार पोवार यांच्यासोबत ते भाजपचा रथ हाकण्याचा प्रयत्न करत आहेत.शिंदे यांच्यामुळे गगनबावडा तालुक्यात भाजप नेतृत्वाखालील पक्षाला उभारी मिळेल, अशी धारणा यामागे भाजप नेतृत्वाची आहे. मात्र, त्यातही त्यांना फारसे यश आले नाही. या तालुक्यात आ. पाटील यांची भूमिका मोलाची ठरणार आहे.सदाशिवराव मंडलिक यांच्याबद्दल या तालुक्यात तितकीच सहानूभुती आहे. त्यांचेच पुत्र शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक या निवडणुकीत सेनेचा धनुष्यबाण घेऊन उभे ठाकणार आहेत. त्यांना आ. चंद्रदीप नरके यांची साथ मिळणे अपेक्षित आहे. तर गेल्या वर्षभरापासून खासदार महाडिक यांनी या तालुक्यातील संपर्क वाढविला आहे. वैभववाडी रेल्वे, गगनबावडा औद्योगिक वसाहतीचे स्वप्न साकार करण्याचे आश्वासन त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून येथील कार्यक्रमात दिलेले आहे.पी. जी. शिंदे यांनी राष्ट्रवादीशी काडीमोड घेतला असला तरी भाजप-सेना युतीमुळे ते कोणती भूमिका घेतात, हे गुलदस्त्यात आहे. गगनबावडा तालुका हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघावर आ. सतेज पाटील यांच्या गटाचे वर्चस्व कायम राहिले आहे. येत्या काही दिवसांत दिसणाऱ्या नेत्यांच्या भूमिकेवर या निवडणुकीचे चित्र अवलवंबून आहे.