शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपूर उपनगराध्यक्ष, सभापतीपदे राष्ट्रवादीकडे?

By admin | Updated: December 28, 2016 00:42 IST

नगरपालिका राजकारण : जयंतरावांची खेळी; राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक अज्ञातस्थळी

अशोक पाटील --इस्लामपूर --इस्लामपूरचे नूतन नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी पदभार स्वीकारला असून, त्यांनी उपनगराध्यक्ष आणि सभापती निवडीसाठीची सभा ४ जानेवारीला बोलावली असल्याचे समजते. त्यापूर्वीच आमदार जयंत पाटील यांनी अपक्ष दादा पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे १४ नगरसेवकांना अज्ञातस्थळी पाठवले आहे. पहिल्याच सभेत उपनगराध्यक्षपद आणि सभापतीपदे राष्ट्रवादीकडे खेचण्यासाठी राजकीय खेळ्या सुरू आहेत.विकास आघाडीचे नूतन नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी सोमवार, दि. २६ डिसेंबररोजी गाजावाजा करून नगराध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला. आता ते पहिल्या सर्वसाधारण सभेची विषयपत्रिका काढणार असल्याचे वृत्त आहे. ४ जानेवारीरोजी ही सभा होणार असल्याचे समजते. त्या अगोदर आमदार पाटील यांनी राष्ट्रवादीतील १४ नगरसेवक आणि अपक्ष दादा पाटील यांना पर्यटनासाठी अज्ञातस्थळी पाठवले आहे. या खेळीमध्ये राष्ट्रवादी यशस्वी झाल्यास उपनगराध्यक्ष आणि सर्व सभापतीपदे राष्ट्रवादीकडे जाणार आहेत.निशिकांत पाटील सध्या वैद्यकीय संकुलात बसून महाआरोग्य शिबिराचे नियोजन करत आहेत. हे शिबिर बुधवारी होत आहे. हा कार्यक्रम यशस्वी केल्यानंतरच ते पालिकेतील पहिल्या सभेची विषयपत्रिका काढणार आहेत. राष्ट्रवादीकडे १४ नगरसेवक आहेत. एकमेव अपक्ष असलेले दादा पाटील त्यांना सामील झाल्यास सदस्यसंख्या १५ होते, तर विकास आघाडीकडे नगराध्यक्षांसह कपबशी चिन्हावर निवडून आलेले नऊ व शिवसेनेचे पाच असे एकूण १४ सदस्य आहेत. शिवसेनेच्या आनंदराव पवार यांनी उपनगराध्यक्ष पदावर दावा केला आहे. त्यामुळे कोणत्या राजकीय घडामोडी होणार, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.कोण काय म्हणाले?इस्लामपूर शहरातील जनतेने परिवर्तनाला साथ दिली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांना माझे आवाहन आहे. इस्लामपुरातील नागरिकांच्या मतांचा विचार करून विकास आघाडीला सहकार्य करावे. आम्ही त्यांच्या सहकार्याने शहराचा विकास करू.- निशिकांत पाटील, नगराध्यक्ष, इस्लामपूर नगरपालिकाइस्लामपुरात पालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदाचे उमेदवार पराभूत झाले असले तरी, आमचे जास्त नगरसेवक निवडून आले आहेत. त्यांना विकास आघाडीपेक्षा जास्त मते आहेत. आमचा ‘कार्यक्रम’ थोडा बिघडला असला तरी, तो आगामी काळात दुरुस्त करू.- जयंत पाटील, आमदार.