शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

तपास यंत्रणेचा अर्ज फेटाळला

By admin | Updated: May 21, 2016 01:13 IST

पानसरे हत्याकांड प्रकरण : समीर गायकवाडवरील दोषारोप लांबणीवर; १० जूनपर्यंत मुदतवाढ

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासातील सहा पुंगळ्या (काडतुसे) इंग्लंडमधील न्यू स्कॉटलँड फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आली आहेत. त्या पुंगळ्या व रिपोर्ट प्राप्त होत नाही, तोपर्यंत संशयित समीर गायकवाडच्या विरोधात दोषारोप निश्चित करू नये, असा विनंती अर्ज ज्येष्ठ विशेष सरकारी वकील हर्षल निंबाळकर यांनी सत्र न्यायालयास सादर केला. तो अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी फेटाळला. दरम्यान, या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी विनंती सरकार पक्षातर्फे करण्यात आली. त्यानुसार न्यायाधीश बिले यांनी दि. १० जूनपर्यंत मुदतवाढ दिली. त्यामुळे संशयित आरोपी समीर गायकवाडच्या विरोधात शुक्रवारी होणारी दोषारोप निश्चिती लांबणीवर पडली. पानसरे यांच्या हत्येप्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याच्या विरोधात दोषारोपपत्र निश्चित करण्याच्या निर्णयावर शुक्रवारी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बिले यांच्या दालनात सुनावणी झाली. यावेळी अ‍ॅड. निंबाळकर यांनी पानसरे यांच्यावर संशयितांनी पिस्तुलातून सहा गोळ्या झाडल्या. त्या गोळ्यांच्या पुंगळ्या इंग्लंडमधील न्यू स्कॉटलँड फॉरेन्सिक लॅबला तपासण्यासाठी पाठविण्यात आल्या आहेत. सध्या काही मुद्देमाल न्यायालयासमोर नाही. कुठल्या पुराव्यांवर न्यायालयाने दोषारोप निश्चित करावे, हे मुद्दे समोर मांडणार होतो; परंतु मुद्देमाल समोर नसल्याने दोषारोप कोणत्या पुराव्यांवर निश्चित करायचे हे सांगू शकत नाही. न्यायालयाने न्यू स्कॉटलँड फॉरेन्सिक लॅबमधून पुंगळ्यांचा (काडतुसे) तपासी अहवाल जोपर्यंत प्राप्त होत नाही, तोपर्यंत दोषारोप निश्चित करू नये, अशी विनंती करत अर्ज सादर केला. त्यावर आरोपीचे वकील समीर पटवर्धन यांनी आक्षेप घेत दोषारोप प्रत्येकवेळी ऐनकेन प्रकारे लांबणीवर टाकले जात आहे. पुढल्या वेळेला दुसरेच कारण पुढे येणार आहे, त्यामुळे आताच दोषारोप निश्चित करावे, अशी विनंती केली. दोन्ही वकिलांचा युक्तिवाद ऐकून न्यायाधीश बिले यांनी विशेष सरकारी वकिलांचा अर्ज फेटाळून लावला. दरम्यान, सरकारी वकील निंबाळकर यांनी इंग्लंडमधील न्यू स्कॉटलँड फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठिवलेल्या पुंगळ्यांचा (काडतुसे) तपासी अहवाल जोपर्यंत सत्र न्यायालयास प्राप्त होत नाही, तोपर्यंत सत्र न्यायालयाने दोषारोप निश्चित करू नये, त्याला स्थगिती मिळावी, यासंबंधी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली. त्यावर न्यायाधीश बिले यांनी दि. १० जूनपर्यंत मुदत दिली. सुनावणीसाठी सशस्त्र पोलिस बंदोबस्तात समीरला न्यायालयात हजर केले होते. यावेळी मेघा पानसरे, पोलिस निरीक्षक अमृत देशमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी) पुरवणी अहवाल सादर पानसरे हत्येचे तपास अधिकारी तत्कालीन अप्पर पोलिस अधीक्षक एस. चैतन्या यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे न्यायालयात उपस्थित राहिले. त्यांनी पुरवणी तपासाचा २० पानी गोपनीय अहवाल न्यायालयास सादर केला. त्यामध्ये दुसऱ्यांदा घटनास्थळाचा केलेला पंचनामा, काही पुरावे, छायाचित्रांचा समावेश आहे.