शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

चंदगड जमीन हडप प्रकरणाची सखोल चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:22 IST

कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील शेकडो एकर शासकीय जमीन ही महसूल व अन्य शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांच्या संगनमताने परस्पर खासगी ...

कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील शेकडो एकर शासकीय जमीन ही महसूल व अन्य शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांच्या संगनमताने परस्पर खासगी लोकांच्या नावावर केली आहे. या जमीन घोटाळ्यातील काही अटक झाले, पण पेशाने डॉक्टर असलेला मुख्यसूत्रधार हा अद्याप मोकाट फिरत असल्याने त्याच्यावरही कारवाई करून प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी शहर व जिल्हा नागरिक कृती समितीच्या वतीने शनिवारी दुपारी अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्याकडे केली.

निवेदनात म्हटले की, चंदगड तालुक्यातील जमीन घोटाळ्यातील प्रमुख सूत्रधार हे पेशाने डॉक्टर आहे. ती व्यक्ती कोल्हापुरातील व्यक्ती असून, तिच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. शासकीय जमीन म्हणजे देशाची, राज्याची म्हणजेच जनतेची मालमत्ता आहे. ती अशा प्रकारे कोणतरी दरोडा घालून लुटले असेल तर ते जनतेचे नुकसानच होईल. त्यामुळे अशा शासकीय मालमत्ता हडप केली जात असेल तर ती पुन्हा शासनाच्या ताब्यात घेणे गरजेचे होय. त्याबाबत कोणत्याही दबावाला आपल्या यंत्रणेचे बळी न घडता जो कोणी गुन्हेगार आहे. त्यांच्यावर लवकरच करवाई करून जनतेला सहकार्य करावे. अन्यथा राज्याचा मालमत्ता माजविण्यासाठी सनदशीर मार्गाने उतरावे लागेल.

या बैठकीस, अशोक पेवार, रमेश मोरे, विनोद डुणूंग, रमाकांत आनग्रे, चंद्राकात पाटील, शंकराराव शळके, राजेश वरक, श्रीकांत भोसले, महदेव पाटील, किशोर घाटगे, सुभषा देयाव, सुभाष देसाई, अंजूम देसाई यांच्यासह पो.नि. लहू शिंदे, पी. गवळी आदी उपस्थित होते.

फोटो नं. २००३२०२०-कोल-चंदगड

ओळ : चंदगड तालुक्यातील शासकीय जमीन घोटाळ्याची सखोल चौकशी करावी या मागणीचे निवेदन शनिवारी दुपारी शहर व जिल्हा कृती समितीच्या वतीने जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांना देण्यात आले.