शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

एकात्म सूत्रात आॅक्सफर्डमधील कारभार

By admin | Updated: February 20, 2017 00:21 IST

देवानंद शिंदे : व्हिजिटिंग स्कॉलर म्हणून परतीनंतर विद्यापीठात विशेष व्याख्यान

कोल्हापूर : आॅक्सफर्ड विद्यापीठात एक देश, एक भाषा, एक संस्कृती आणि एक कायदा अशा एकात्म सूत्रात कारभार चालतो. एकूणच तेथील शिस्त आणि संशोधन-अध्यापन संस्कृती अत्यंत अनुकरणीय आहे, अशी भावना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी शनिवारी येथे व्यक्त केली.कुलगुरू डॉ. शिंदे हे युरोपियन युनियनच्या ‘नमस्ते’ प्रकल्पांतर्गत इंग्लंडच्या आॅक्सफर्ड विद्यापीठात व्हिजिटिंग स्कॉलर म्हणून एक महिना संशोधन करून नुकतेच परतले. त्यांच्या आॅक्सफर्ड येथील अनुभवाचा लाभ शिवाजी विद्यापीठातील शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, संशोधक, विद्यार्र्थी-विद्यार्थिनींचा मिळावा, यासाठी विद्यापीठाच्या कुलगुरूंचे विशेष व्याख्यान शनिवारी राजर्षी शाहू सभागृहात आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कुलगुरू म्हणाले, आॅक्सफर्ड विद्यापीठात संशोधन आणि अध्यापनाची तिथे इतकी अप्रतिम सांगड घातली गेली आहे की, त्यामुळेच या विद्यापीठातून आजपर्यंत ५० हून अधिक नोबेल विजेते आणि जागतिक स्तरावर गौरविले गेलेले शास्त्रज्ञ, साहित्यिक, कलाकार निर्माण झाले. येथे जनतेच्या प्राधान्यक्रमावर सर्वप्रथम देश असतो. त्यानंतर संस्था, कुटुंब आणि सरतेशेवटी ‘मी’ असतो. या ‘मी’पणापासून मुक्ती मिळविण्याची शिकवण आॅक्सफर्डने दिल्याचे त्यांनी सांगितले. सुरुवातीला कुलगुरू डॉ. शिंदे यांनी पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनद्वारे आॅक्सफर्ड विद्यापीठासह भेटी दिलेली अन्य विद्यापीठे, विविध शहरे, प्रयोगशाळा यांची माहिती दिली. यावेळी परीक्षा नियंत्रक महेश काकडे, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, विद्यार्र्थी कल्याण संचालक डॉ. आर. व्ही. गुरव यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सेवक, संशोधक विद्यार्र्थी-विद्यार्थिर्नी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘बीसीयूडी’चे संचालक डॉ. डी. आर. मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. नंदिनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले.सुसज्ज ग्रंथालये दीड लाख लोकवस्तीच्या आॅक्सफर्ड गावात सुमारे १२५ ग्रंथालये आहेत. येथील मध्यवर्र्ती ग्रंथालयात सुमारे एक कोटी वीस लाख ग्रंथ असून, सन १६२० पासून प्रसिद्ध झालेले प्रत्येक पुस्तक या ठिकाणी उपलब्ध आहे. इतक्या प्रचंड संग्रहातील कोणतेही पुस्तक अवघ्या तीन मिनिटांत वाचकाला उपलब्ध करण्यात येते.