शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

हस्तक्षेपाशिवाय पूररेषा तयार करण्याच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:27 IST

येथील असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस् अँड इंजनिअर्स या संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन ...

येथील असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस् अँड इंजनिअर्स या संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

जयंत पाटील म्हणाले, कोल्हापूर आणि सांगली शहरांसह शिरोळ तालुक्याची पूरस्थितीतील गंभीरता कमी आणण्यासाठी पंचगंगेचे पाणी भूमिगत पद्धतीने थेट राजापूर बंधाऱ्याखाली नेता येईल का यावर अभ्यास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तीनही महापुरावेळी वेगवेगळी परिस्थिती होती. त्यामुळे त्यावर एकच उत्तर नाही. कोयना, वारणा धरण आणि कोल्हापूर जिल्ह्यात धरण प्रदेशात मोठा पाऊस झाला की सगळे पाणी कृष्णेत येते. राजापूर बंधाऱ्याच्या अलीकडे प्रचंड पाणी फुगवटा तयार होतो. त्याचा फटका सांगली, म्हैसाळ, राजापूरसह शिरोळ तालुका आणि कोल्हापूर शहरालाही बसतो. त्यामुळेच हे पाणी राजापूर बंधाऱ्याच्या खाली नेण्याचा विचार आहे. योजना खर्चिक आहे. परंतु, काहीतरी निर्णय घेण्याची गरज आहे.

बदलत्या परिस्थितीची मांडणी करताना पाटील म्हणाले, भान विसरून आम्ही कामाला लागलो. कुठेही गेले तरी गाडीच्या टायरला माती लागू नये यासाठी पेव्हिंग ब्लॉक घालत सुटलो. पाणी मुरण्याच्या जागा बंद केल्या. परिणामी नद्या, नाल्यांचे पाणी बाहेर पडू लागले. आता नव्याने पूररेषा करावी लागेल. ज्यामध्ये पूर्ण स्पष्टता असेल. फ्लॅट किंवा जागा घेताना येथे किती पाणी येऊ शकते याची माहिती आधीच ग्राहकाला मिळाली पाहिजे. ग्रामीण आणि शहरी नियमांमध्येही मोठा फरक असतो. त्यामुळे ग्रामपंचायती महानगरपालिकांमध्ये विलीन होण्यास तयार नसतात. शहराजवळच्या ग्रामपंचायतींबाबतच्या नियमांबाबतही फेरविचाराची गरज आहे. अत्यावश्यक ठिकाणी नदीला भिंत घालून आपण ठरावीक पातळीपर्यंत दक्षता घेेऊ शकतो.

चौकट

पाटील म्हणाले, यंदा धरणातून पाणी सोडण्याचे जे आम्ही नियोजन केले त्याला यश आले. त्यामुळे पुराची तीव्रता कमी होण्यास मदत झाली. पालकमंत्री सतेज पाटीलही सातत्याने याबाबत पाठपुरावा करत होते. वडनेरे समितीने जरी अलमट्टीचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले असले तरी तेथील पाण्याचा विसर्ग वाढला की आपल्याकडील पाणी वेगाने खाली जाण्यास मदत होते हे मान्यच करायला हवे. म्हणूनच मी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांची भेट घेतली होती. याआधी कधीही याबाबत दोन्ही राज्यांचा इतका प्रभावी समन्वय नव्हता, असे कर्नाटकच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आमच्या प्रयत्नांना यश आले आणि त्यांनी साडेतीन लाख क्युसेकपर्यंत पाणी सोडण्याची भूमिका घेतली.