शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

कलानगर-चंदूर मार्गावरील रेंगाळलेल्या पुलाची पाहणी

By admin | Updated: July 1, 2016 23:41 IST

अहवालाकडे लक्ष : प्रवीण किडे यांच्यासह पथकाकडून शहानिशा

इचलकरंजी : कलानगर-चंदूर मार्गावरील रेंगाळलेल्या पुलाच्या कामाची पुणे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रवीण किडे यांनी पथकासह शुक्रवारी पाहणी केली. यावेळी परिसरातील तक्रारदार नागरिकांच्या समस्याही जाणून घेतल्या. दरम्यान, गेल्या अनेक वर्षांच्या मागणीनंतर हा पूल मंजूर झाला असल्याने अधिकाऱ्यांनी यातून तत्काळ मार्ग काढून पुलाचे काम पूर्ण करावे, अशा सूचना आमदार सुरेश हाळवणकर यांनी दिल्या.कलानगर-चंदूर मार्गावरील पुलाचे बांधकाम सुरू झाले. कॉलम उभारल्यानंतर पुलाची संभाव्य उंची लक्षात आली. या उंचीचा पूल उभारल्यास या मार्गाला येऊन मिळणारे दोन रस्ते बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे या परिसरातील काही ग्रामस्थांनी पुलाची उंची कमी करावी, अशी मागणी केली. मंजूर झालेल्या पुलाची उंची कमी करणे आपल्या हातात नसल्याचे सांगत मक्तेदार व हातकणंगले बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी काम सुरूच ठेवले. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी या मार्गावरून होणाऱ्या ऊस व यंत्रमाग उद्योगातील वाहनांना मार्गाची व्यवस्था करा, अशी मागणी केली. त्यामुळे पुलाचे काम सहा महिन्यांपासून बंद पडले आहे.यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक एस. आर. साळोखे, कार्यकारी अभियंता डी. एस. पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, पाहणीनंतर कोणता निर्णय घेतला जातो? याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे. (वार्ताहर)रस्ता निकृष्ट दर्जाचा : पावसाळ्यात कसरतचंदूरसह रुई व कबनूरच्या वाढीव वसाहतींकडे जाणारा हा प्रमुख मार्ग असल्याने या मार्गावरील नागरिकांची पुलाचे काम तटल्याने गैरसोय होऊ लागली. पर्यायी निर्माण करण्यात आलेला तात्पुरता रस्ता निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे पावसाळ्यात या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना कसरत करावी लागते. या पुलाचे काम तत्काळ सुरू करावे, अशी मागणी करत रास्ता रोकोसह विविध आंदोलने करून आमदार सुरेश हाळवणकर यांना निवेदने देण्यात आली. त्यावर हाळवणकरांनी परिसरातील नागरिकांचे म्हणणे व पुलाच्या उंचीसंदर्भातील तांत्रिक अडचणी तपासून पाहून मार्ग काढून तत्काळ पूल बांधावा, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या. त्यानुसार पुणे बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता किडे यांनी शुक्रवारी पाहणी करून परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत.