शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाई मंदिराची पाहणी

By admin | Updated: February 23, 2017 00:48 IST

विभागीय आयुक्तांची भेट : अहवाल नगरविकास विभागाकडे पाठविणार

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिराचा विकास आराखड्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी मंदिर व परिसराची तसेच व्हीनस कॉर्नर येथील प्रस्तावित पार्किंग व यात्री निवासाच्या जागेची पाहणी केली. या पाहणीचा स्वतंत्र अहवाल येत्या दहा दिवसांत राज्याच्या नगरविकास विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. अंबाबाई मंदिराचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा २५० कोटींचा असून पहिल्या टप्प्यात ७५ कोटींची विकासकामे करण्यात येणार आहे. सदर आराखड्याचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात येत आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांनी अंबाबाई मंदिराच्या अंतर्गत व बाह्ण परिसराची सुमारे दोन तास पाहणी केली. त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, आयुक्त पी. शिवशंकर, वास्तुविशारद तज्ज्ञ अमरजा निंबाळकर, इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे प्राध्यापक बी. बी. बिराजदार, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, देवस्थान समितीचे सचिव विजय पोवार, सहसचिव एस. एस. साळवी, अभियंता सुदेश देशपांडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. दुपारी चारच्या दरम्यान विभागीय आयुक्तांनी मंदिराची पाहणी सुरू केली. महापालिकेने पूर्वी प्रस्तावित केलेल्या विद्यापीठ दरवाजा येथील दर्शन मंडपाची जागा व नव्याने सुचवण्यात आलेल्या फरासखान्याची इमारत त्यांनी पाहिली व पूर्वी असा चुकीचा प्रस्ताव का दिला गेला, अशी विचारणा करीत दोन्ही पर्यायांची तौलनिक माहिती घेतली. मंदिरातील नगारखाना, मनकर्णिका कुंड परिसर, घाटी दरवाजा, मंदिराचा ढाचा आणि जतन संवर्धनासंबंधीची सूक्ष्म माहिती घेतली. तत्पूर्वी त्यांनी व्हीनस कॉर्नर येथील बहुमजली पार्किंग व त्यावर उभारण्यात येणाऱ्या यात्री निवासाच्या जागेची पाहणी केली. यावेळी त्यांनी मंदिराचे करण्यात येत असलेले स्ट्रक्चरल आॅडिट, डिजिटायझेशन या सगळ्या प्रक्रिया सुरू ठेवण्याची सूचना केली. त्यांच्या या पाहणीचा स्वतंत्र अहवाल तयार करून तो नगरविकास विकास विभागाकडे छाननीसाठी पाठवण्यात येणार आहे.