शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

राज्य बँकेने विक्री केलेल्या कारखान्यांच्या संचालकांची चौकशी लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : साखर कारखाने आर्थिक अडचणीत आल्याने राज्य बँकेने रितसर टेंडर काढून कारखान्यांची विक्री केली. असे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : साखर कारखाने आर्थिक अडचणीत आल्याने राज्य बँकेने रितसर टेंडर काढून कारखान्यांची विक्री केली. असे असताना भाजपचे नेते ईडीची कारवाई करत आहेत. मात्र, ज्यांच्यामुळे हे साखर कारखाने अडचणीत आले त्या संचालकांची चौकशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लावावी, अशी मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.

साखरेचे दर व द्यावी लागणारी ऊसाची एफआरपी याचा ताळमेळ बसत नसल्याने साखर कारखाने कोट्यवधींच्या तोट्यात गेले. परिणाम राज्य बँकेचे कर्ज थकीत गेले आणि बँकही अडचणीत येऊ लागली. बँकेचा एनपीए वाढल्याने नाईलाजाने बँकांना साखर कारखाने विकण्याशिवाय पर्याय नसतो.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने जे कारखाने विकले आहेत त्यांची किंमत करून प्रसिद्धी माध्यमातून निविदा काढून ज्यांची जास्त बोली आलेली आहे, त्यांनाच हे कारखाने विकले गेले आहेत. असे असताना केवळ राजकारण म्हणून यामध्ये घोटाळे आहेत. ईडीची चौकशी केली गेली. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून विक्री झालेल्या म्हणजेच सर्व ५४ कारखान्यांची चौकशी लावणार असल्याचे चंद्रकांत पाटील सांगत आहेत. मी त्यांना विनंती करेन की त्यांनी तत्काळ विनाविलंब चौकशी लावावी. या सगळ्या व्यवहाराचे दूध का दूध, पानी का पानी यापूर्वीच झालेले आहे. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी झालेली आहे, माजी न्यायाधीशांनीदेखील चौकशी केलेली आहे. त्यातून काहीही निष्पन्न झालेले नाही. ज्या कारखान्यांच्या संचालकांनी कारखाने तोट्यात घातले त्यांची वास्तविक चौकशी होणे गरजेचे असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे.