शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजी पालिका कारभाराची चौकशी करा

By admin | Updated: August 15, 2016 00:56 IST

उच्च न्यायालयाचे आदेश : धैर्यशील सुतार यांची माहिती

इचलकरंजी : येथील नगरपालिकेमधील गैरकारभाराची चौकशी करून त्याचा अहवाल देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने लाचलुचपत विभागाला दिले असल्याची माहिती अ‍ॅड. धैर्यशील सुतार यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. साधारणत: डिसेंबर महिन्यामध्ये होणाऱ्या नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीवर याचा परिणाम होण्याची शक्यता असल्याने नगरपालिका क्षेत्रात खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडील चौकशी निवडणुका समोर असतानाच होणार असल्याने नगरसेवकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. इचलकरंजी नगरपालिकेकडील गैरकारभाराची चौकशी करावी, अशा आशयाची याचिका अ‍ॅड. सुतार यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. सुनावणी न्यायाधीश हिमांशू केमकर व न्यायाधीश एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठासमोर जून महिन्यात झाली. त्यावेळी नगरपालिका संचलनालयाचे संचालक यांना गैरकारभाराच्या चौकशीचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला प्रतिवादी करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला चौकशी करण्याचे लेखी कळविण्यात आले आहे. (प्रतिनिधी) दैनंदिन कार्य पार पाडण्यासाठी पालिका असमर्थ नगरपालिकांची असलेली विविध कर्तव्ये इचलकरंजी नगरपालिका पार पाडू शकत नाही. त्यामध्ये पंचगंगा नदी प्रदूषण, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, आदींचा शहरात बोजवारा उडाला आहे. नगरपालिकेकडील खर्च अवाढव्य वाढला आहे. त्यामुळे पालिकेची दैनंदिन कार्ये पार पाडण्यात पालिका असमर्थ ठरली आहे. भुयारी गटार योजना, झोपडपट्टी पुनर्वसन योजना अशी कामेसुद्धा भ्रष्टाचारामुळे पूर्ण होऊ शकत नाहीत, अशा आशयाचे आरोप याचिकेत करण्यात आले आहेत.