शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

निष्क्रियतेने ‘सीपीआर’चा निधी परत

By admin | Updated: April 16, 2015 00:23 IST

शिवसेनेचे आंदोलन : अधिष्ठाता हटविण्याची, आवश्यक उपकरणे घेण्याची मागणी

कोल्हापूर : निष्क्रिय, कामचुकार प्रशासनामुळेच छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयाचा (सीपीआर) विविध उपकरणे खरेदीसाठीचा शासकीय निधी परत गेला आहे. त्याला जबाबदार असलेल्या प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या कामकाजाची चौकशी व्हावी शिवाय राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दशरथ कोठुळे यांना पदावरून हटवावे, अशी मागणी करीत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने बुधवारी प्रभारी अधिष्ठाता डॉ. रघुजी थोरात यांना धारेवर धरले. ‘हटवा, हटवा अधिष्ठाता हटाव’, ‘निष्क्रिय प्रशासनाचा धिक्कार असो’, अशा घोषणा देत शिवसेनेच्या शिष्टमंडळासह कार्यकर्त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यालयात प्रवेश केला. अधिष्ठाता डॉ. दशरथ कोठुळे कक्षात नसल्याने शिष्टमंडळाशी प्रभारी अधिष्ठाता डॉ. रघुजी थोरात यांनी चर्चा सुरू केली. यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी सीपीआरमधील डॉक्टरांमध्ये व्यावसायिकपणा आल्यामुळे या रुग्णालयाला अवकळा आली आहे. सीटी स्कॅन मशिनरी, व्हेंटिलेटर आदी उपकरणांसाठी शासनाकडून पुरेसा निधी मिळूनदेखील रुग्णालय प्रशासनाच्या लालफितीचा कारभार आणि उपकरणे खरेदीतील ‘अर्थ’पूर्ण व्यवहारामुळे निधी परत गेला आहे.शिष्टमंडळाने एक तासाहून अधिकवेळ डॉ. थोरात, मेडिकल सुपरिटेंड डॉ. डी. ए. पावले, राजीव गांधी जीवनदायी योजनेचे समन्वयक डॉ. देठे यांना धारेवर धरले. यावेळी कमलाकर जगदाळे, शुभांगी साळोखे, नगरसेवक राजू हुंबे, दिलीप पाटील-कावणेकर, रवी चौगुले, विराज पाटील, शशी बिडकर, तानाजी मिठारी, सुजाता सोहनी, रणजित आयरेकर, आदी उपस्थित होते.