शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

बावड्यात घुसखोरीचा डाव

By admin | Updated: August 11, 2015 00:43 IST

महाडिकांची भिस्त नाराजांवर : उमेदवार देताना सतेज पाटलांची कसरत

रमेश पाटील - कसबा बावडा महापालिका निवडणुकीत कसबा बावड्यातील आपल्या गटाचे, पक्षाचे सर्वच उमेदवार निवडून यावेत म्हणून माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आमदार महादेवराव महाडिक, राजेश क्षीरसागर, माजी आमदार मालोजीराजे यांनी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बावड्याकडे आतापासूनच नजरा लागल्या आहेत.बावड्यातील प्रत्येक प्रभागात महाडिक गटाचा उमेदवार असणार असल्याचे माजी नगरसेवक व राजाराम कारखान्याचे संचालक हरीश चौगले व दिलीप उलपे यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यानुसार त्यांनी तयारी सुरू ठेवली आहे. शिवसेनेकडे प्रत्येक प्रभागातून निवडणूक लढविणाऱ्यांची संख्या जास्त आहे. प्रत्येक प्रभागात उमेदवार असावा यादृष्टीने क्षीरसागर यांनी चाचपणी सुरू ठेवली असल्याचे कसबा बावडा शिवसेना शाखेचे प्रमुख सुनील जाधव यांनी स्पष्ट केले. त्यामुळे बावड्यातील प्रत्येक प्रभागात तिरंगी लढती पाहावयास मिळणार आहे. या प्रमुख तिरंगी लढतींशिवाय अपक्ष उमेदवार रिंगणात मोठ्या संख्येने उतरण्याची शक्यता आहे.नुकत्याच झालेल्या राजाराम साखर कारखाना निवडणुकीत महादेवराव महाडिक यांचे पॅनेल विजयी झाले. निवडणुकीच्यावेळी दिलेल्या त्रासाचा वचपा काढण्यासाठी सतेज पाटील यांच्या बालेकिल्ल्यात घुसण्याचा प्रयत्न महाडिक गटाकडून होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. प्रत्येक प्रभागात ताकदीचा उमेदवार देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होणार आहे.दरम्यान, बावड्यातून मोठ्या प्रमाणात इच्छुक आहेत. बहुतेकांना सतेज पाटील गटाची उमेदवारी हवी आहे; पण प्रभागात केवळ एकालाच संधी मिळणार आहे. अशा वेळी काहीजण नाराज होण्याची शक्यता आहे. अशा नाराजांवर लक्ष ठेवण्याचे काम महाडिक गटाकडून होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाराज विरोधकांच्या गळाला लागू नये याची काळजीही सतेज पाटील गटाला घ्यावी लागणार आहे. कसबा बावडा परिसरात पाच प्रभाग आहेत. या सर्व प्रभागांत सध्या सतेज पाटील गटाचे नगरसेवक आहेत. प्रतिस्पर्ध्यांना शह देण्यासाठी महाडिकांच्या दृष्टीने बावड्यातील विजय महत्त्वाचा आहे. त्यामुळेच येथील लढती अटीतटीच्या होणार हे मात्र निश्चित..!