शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगांना ३० टक्के ऑक्सिजन वापरण्यास परवानगी द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:22 IST

कोल्हापूर : शेती उत्पादने, अत्यावश्यक दुरुस्ती, रुग्णवाहिका, ऑइल इंजिन, ऑक्सिजन उत्पादन, पुरवठा कोल्हापुरातील औद्योगिक वसाहतींमधून केला जातो. उद्योगांना ऑक्सिजनची ...

कोल्हापूर : शेती उत्पादने, अत्यावश्यक दुरुस्ती, रुग्णवाहिका, ऑइल इंजिन, ऑक्सिजन उत्पादन, पुरवठा कोल्हापुरातील औद्योगिक वसाहतींमधून केला जातो. उद्योगांना ऑक्सिजनची नितांत गरज आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उद्योगांना सद्य:स्थितीत ३० टक्के ऑक्सिजन वापरण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनने रविवारी केली. याबाबतचे निवेदन असोसिएशनच्या वतीने पालकमंत्री सतेज पाटील, आ. चंद्रकांत जाधव आणि जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले.

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढविल्याने प्रशासनाने गेल्या काही दिवसांपासून उद्योगांना ऑक्सिजन वापरण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे. कोरोना रुग्णांना प्राध्यानाने ऑक्सिजन मिळाले पाहिजे. रुग्णसंख्या कमी होण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. प्रशासनाला आमच्या उद्योजकांकडूनही सर्वतोपरी सहकार्य केले जाते. या चांगल्या प्रयत्नामुळे कोल्हापूर जिल्ह्यात बाधित रुग्णांपेक्षा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त असून हे प्रशासनाने केलेल्या कामाचे यश आहे. सध्या रुग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे रुग्णांना लागणारा ऑक्सिजनचा वापर कमी होत आहे. काही ऑक्सिजनसाठा शिल्लक राहत आहे. सुदैवाने कोल्हापुरातही ऑक्सिजन उत्पादक आणि पुरवठादार असून यामुळे ऑक्सिजनबाबत कोल्हापूर सक्षम आहे. या परिस्थितीचा विचार करता उद्योगांना शंभर टक्के ऑक्सिजन वापरांवर घातलेल्या बंदीमध्ये थोडी शिथिलता द्यावी. उद्योगांसाठी ३० टक्के ऑक्सिजन उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष सचिन मेनन, उपाध्यक्ष हर्षद दलाल आणि सचिव दिनेश बुधले यांनी केले.