शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
4
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
5
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
6
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
7
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
8
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
9
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
10
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
11
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
12
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
13
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
14
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
15
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
16
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
17
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
18
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
19
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
20
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?

उत्तूरमध्ये बहुरंगी लढत रंगण्याचे संकेत

By admin | Updated: December 30, 2016 00:11 IST

राजकीयदृष्ट्या संवेदनशील मतदारसंघ : काँग्रेस, राष्ट्रवादी व महाआघाडीत सामना; विजयाची कोणालाच खात्री नाही

रवींद्र येसादे --उत्तूर --राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणारा उत्तूर मतदारसंघ सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला असल्याने तिरंगी अथवा चौरंगी लढतीचे चित्र निर्माण होत असून, विजयाची खात्री निश्चितपणे कोणालाही देता येत नाही. काँग्रेसची ही जागा हिसकावून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व्यूहरचना आखत असून, गतवेळी आजरा विकास आघाडीतून काँग्रेसच्या तिकिटावर उमेश आपटे हे निवडून आले होते. ते महाआघाडीत नसल्याने महाआघाडी स्वतंत्र उमेदवार उभा करणार आहे. येथे अपक्षांसह बहुरंगी लढत होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.‘गोकुळ’चे संचालक रवींद्र आपटे यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडी स्थापन करण्यात आली. कारखान्यात यश मिळाल्याने महाआघाडीने निवडणुकीची जय्यत तयारी केली आहे. कारखाना निवडणुकीत उत्तूर-मडिलगे गटातून काँग्रेस व राष्ट्रवादीत युती झाल्यामुळे उमेश आपटे यांना उमेदवारी देण्यात आली. आपटे व वसंतराव धुरे विजयी झाले. राष्ट्रवादीतून उमेदवारी न दिल्याने मारुती घोरपडे यांनी बंडखोरी करीत महाआघाडीत प्रवेश केला व ते विजयी झाले. महाआघाडीने अंतर्गत मोर्चेबांधणी सुरू केली असून, महाआघाडी ठरवेल त्या उमेदवाराच्या पाठीशी राहावे, असे आवाहन कार्यकर्त्यांना करण्यात येत आहे. राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांना विजयी न करण्याचा निर्धार आघाडीने घेतलेल्या मेळाव्यात केला आहे. मात्र, महाआघाडीत उमेदवारी निवड करताना कसरत करावी लागणार आहे.आमदार हसन मुश्रीफ यांनी मतदारसंघात केलेली विकासकामे जनतेसमोर मांडली जाणार आहेत. पाच वर्षांत जि. प. सदस्य उमेश आपटे यांनी केलेली कामे जनतेला सांंगून ते निवडणुकीस सामोरे जात आहेत. जि.प. मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची पकड मजबूत असतानाही राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीचा फटका बसत आहे.मागील निवडणुकीत धुरे यांच्याविरोधात सारे एकत्र आले होते. आमदारकीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीतील मंडळी एक होतात व इतर निवडणुकीत का एक होत नाहीत, हा प्रश्नच विचारला जात आहे. आपटे हे गेली १५ वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थेत काम करतात. मागील राजकारणाच्या जोरावर मोर्चेबांधणी व वैयक्तिक गाठीभेटी सुरू केल्या आहेत. महाआघाडीचे नेते एकीकडे तर सामान्य माणूस आपटे यांच्यासोबत असल्याचे बोलले जात आहे.आमदार सतेज पाटील यांनी उमेश आपटे यांना अध्यक्षपदाची संधी जिल्हा परिषदेत दिली. हा राग माजी आमदार महादेवराव महाडिक यांना आहे. महाआघाडीस महाडिक यांची साथ आहे. महाआघाडीचे नेतृत्व ‘गोकुळ’चे संचालक रवींद्र आपटे यांच्याकडे आहे. यावेळी महाआघाडीस राष्ट्रवादी व काँग्रेस हे दोन शत्रू घेऊन आखणी करावी लागणार आहे.आजी-माजी आमदारांचे विशेष लक्षउत्तूर येथील उमेदवारी ठरविण्यापासून निवडून आणेपर्यंत आजी व माजी आमदारांना विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. राष्ट्रवादीकडून आमदार हसन मुश्रीफ, काँग्रेसकडून आमदार सतेज पाटील, भाजपकडून पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार हाळवणकर, शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख विजय देवणे, माजी आमदार संजय घाटगे, महाआघाडीकडून माजी आमदार महादेवराव महाडिक यांना प्रयत्न करावे लागणार आहेत.भाजपनेही स्वबळाची भाषा केली आहे. तशी उमेदवारांनी मागणीही पक्षाकडे केली आहे. किती दिवस आघाडीला पाठिंबा द्यायचा, पक्षाचा विस्तार कसा होणार, ही भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली. वरिष्ठांच्या आदेशानुसार शिवसेना स्वबळासाठी सज्ज आहे, तसे उमेदवारही निश्चित केले आहेत. विश्वनाथ करंबळी यांनी उमेदवारी एकमताने ठरविली तर आपण निवडणूक लढवू; अन्यथा महाआघाडीस पाठिंबा देऊ, असे स्पष्ट केले आहे. मतदारसंघ खुला असल्याने महाआघाडीतील घटक पक्ष भाजप, शिवसेना, जनता दल व इतरही उमेदवारांसाठी आग्रह धरीत आहेत. त्यामुळे आघाडीत इच्छुकांची संख्या वाढण्याचे संकेत मिळत आहेत.मतदारसंघातील गावे उत्तूर, चव्हाणवाडी, करपेवाडी, मुमेवाडी, बहिरेवाडी, पेंढारवाडी, आर्दाळ, जाधेवाडी, मासेवाडी, खोराटवाडी, भादवण, भादवणवाडी, मडिलगे, सोहाळे, वडकशिवाले, महागोंड, वझरे, चिमणे, करपेवाडी, व्होन्याळी, झुलपेवाडी, धामणे, बेलेवाडी. उमेदवाराचा शोधभादवण गटातून मागास महिला गटाचे आरक्षण पडल्यामुळे इच्छुकांची संख्या फारच कमी आहे. शिवसेनेला व महाआघाडीस उमेदवार मिळाला आहे. भादवण अथवा मडिलगेसही जागा देण्यात येणार आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीने सावध भूमिका घेत उमेदवारी जाहीर केलेली नाही. उमेदवाराचा शोध सुरू आहे. भादवण, मडिलगे वगळता अन्य गावांच्या उमेदवारांचा विचार होऊ शकतो.