शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय बेसबॉल संघात कोल्हापूरची गिरिजा....

By admin | Updated: August 14, 2016 01:02 IST

राज्यातून एकमेव खेळाडू : द. कोरियातील विश्वचषक स्पर्धेसाठी निवड

कोल्हापूर : दक्षिण कोरियामध्ये होणाऱ्या विश्वचषक बेसबॉल स्पर्धेसाठी भारतीय महिला संघात कोल्हापूरच्या गिरिजा सुनील बोडेकर हिची निवड झाली. गिरिजा ही कमला महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये तिने हे यश मिळविले.कदमवाडी येथे राहणारी गिरिजा शां. कृ. पंत वालावलकर हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असताना तिची बेसबॉल खेळाची ओळख झाली. क्रीडाशिक्षक राजेंद्र बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तिने अल्पावधीतच या खेळात प्रावीण्य मिळविले. जिल्ह्णातील, विभागीय, राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत तिने यशस्वी कामगिरी केली आहे. बेळगाव येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतून तिची या स्पर्धेसाठी निवड झाली. ही स्पर्धा सप्टेंबरमध्ये होणार आहे. गिरिजा कमला विद्यालयात बी. ए. द्वितीय वर्षात शिकत आहे. तिच्या आई सुधा गृहिणी आहेत, तर वडील सुनील एका शाळेत लिपिक आहेत. तिला यासाठी या उभयतांचे पाठबळ आणि जिल्हा बेसबॉल संघटनेचे अध्यक्ष धनंजय महाडिक, नगरसेवक नाना कदम यांचे प्रोत्साहन लाभले. (प्रतिनिधी)नियमित सरावातील सातत्य हेच माझ्या निवडीमागील रहस्य आहे. वेगळे काहीतरी करून दाखविण्याची संधी मला मिळाली आहे. तिथे दमदार कामगिरी करून भारतीय संघास पदक मिळवून देणारच.- गिरिजा बोडेकर भारतीय संघाच्या निवड चाचणीत महाराष्ट्रातून चार मुलींचा सहभाग होता. त्यामधून एकमेव गिरिजाची निवड झाली, हा माझ्यासाठी सर्वांत मोठा आनंद आहे. तिची घरची परिस्थिती बेताची असल्याने तिला दानशूर व्यक्तींनी आर्थिक मदत केल्यास ती यशस्वी कामगिरी करेल.- राजेंद्र बनसोडे, प्रशिक्षक