शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाई मंदिरासाठी स्वतंत्र पोलिस ठाणे

By admin | Updated: May 10, 2016 02:33 IST

गृहविभागाचा सकारात्मक प्रतिसाद : लवकरात लवकर निर्णय होण्याची भाविकांची मागणी

गणेश शिंदे --कोल्हापूर --करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवी मंदिराचे धार्मिक महत्त्व आणि दिवसेंदिवस वाढत चाललेली भाविकांची संख्या याचा विचार करून जिल्हा पोलिस प्रशासनाने अंबाबाई देवी मंदिरासाठी पाठविलेल्या स्वतंत्र पोलिस ठाण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या विचाराधीन आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनीही यासाठी पाठपुरावा केला असून, नुकतेच कोल्हापूरच्या दौऱ्यावर आलेले गृहविभागाचे अप्पर सचिव के. पी. बक्षी यांनीही याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याने पोलिस ठाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागला आहे. श्री अंबाबाई मंदिर हे जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येते. तसेच शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्यातील रोज दोन वेगवेगळे कर्मचारी दिले जातात; पण येथे सुरक्षेसाठी बहुतांशवेळा मुख्यालयातूनच फौजफाटा आणावा लागतो. महाराष्ट्रासह शेजारच्या राज्यातून भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. विशेषत: सुटीच्या काळात मंदिरात गर्दी होते. काही वर्षांपूर्वी अक्षरधाम मंदिरावरील झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्वच धार्मिक स्थळांची तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने गंभीर दखल घेऊन त्यांची सुरक्षितता वाढविली. अंबाबाई देवी मंदिरात दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांमुळे जिल्हा पोलिस प्रशासनाने मंदिराच्या मुख्य दरवाजासह पश्चिम, दक्षिण व उत्तर या चारही दरवाजाला कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिस कर्मचारी दिले. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने सुरक्षारक्षक नेमले; पण गेल्या काही वर्षांमध्ये मंदिरात व मंदिर परिसरात होणारी विविध आंदोलने, भाविकांचा वाढलेला ताण यामुळे अंबाबाई देवी मंदिरासाठी स्वतंत्र पोलिस ठाणे असा प्रस्ताव जिल्हा पोलिस प्रशासनाने तयार केला आहे. पण, यावर अद्याप निर्णय झालेला नाही. स्वतंत्र पोलिस ठाण्याचा प्रस्ताव राज्य शासनाने लवकर मंजूर करावा, अशी मागणी शहरवासीयांमधून होत आहे.१०० पोलिस, अधिकारी-कर्मचाऱ्यांचा फौजफाटा...सध्या जिल्हा पोलिस प्रशासनाने अंबाबाई देवी मंदिराकरिता ३४ पोलिस कर्मचारी दिले आहेत. या कर्मचाऱ्यांना आठ-आठ तास अशा तीन वेळेत सेवा बजावावी लागत आहे. मंदिरातील अपुरे मनुष्यबळ याचा विचार करून प्रशासनाने मंदिरासाठी १०० पोलिस कर्मचारी असलेला स्वतंत्र पोलिस ठाण्याचा प्रस्ताव गृह विभागाला पाठवून दिला आहे. मात्र, त्यावर अजून निर्णय झालेला नाही.