शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीने कृष्णाकाठचा द्राक्षबागायतदार हवालदिल

By admin | Updated: March 16, 2015 00:05 IST

भिलवडी परिसरात स्थिती : उत्पादकांचे अतोनात नुकसान

शरद जाधव - भिलवडी गेल्या पंधरा दिवसांपासून अचानक सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे पलूस तालुक्यातील विशेषत: कृष्णाकाठच्या परिसरातील गावांमधील शेतकरी कमालीचा हवालदिल झाला आहे. हाता-तोंडाशी आलेले पीक वाया जात असल्याने लाखोंचा फटका बसला आहे.कृष्णाकाठ तसा ऊस उत्पादक शेतीचा पट्टा, पाण्याची मुबलक उपलब्धता. येथील शेतकरी वर्गही प्रयोगशील. नेहमी नावीन्यपूर्ण पिके घेण्याचा शेतकऱ्यांचा हातखंडा. भिलवडी, अंकलखोप, नागठाणे, माळवाडी, खंडोबाचीवाडी, भिलवडी स्टेशन, बुरूंगवाडी, हजारवाडी, आमणापूर, बोरजाईनगर, पलूस, विठ्ठलवाडी, कुंडल, बांबवडे, आंधळी, मोराळे आदी भागात मोठ्या प्रमाणात द्राक्षाचे पीक घेतले जाते. काही ठिकाणी काळी, कसदार, पाणी साचून राहणारी जमीन, तर काही ठिकाणी मुरमाड निचऱ्याची जमीन. माळरानामध्ये विहिरीचे तसेच कृ ष्णा नदीतून जलवाहिनी करून शेतकऱ्यांनी पाण्याची सोय केली. काळ्या जमिनीमध्ये मुरूम टाकून पाण्याच्या निचऱ्याच्या सोय करून शेतकऱ्यांनी कष्टाने द्राक्षबागा फुलविल्या. काही काळ मोठा फायदाही मिळविला.परराज्यातील द्राक्ष व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या घटनाही घडल्या. पण, निसर्गाने दिलेली साथ, भरघोस उत्पादन, मालास मिळालेला योग्य दर यामुळे शेतकरी वर्ग कसाबसा सावरत होता. पण बघता-बघता द्राक्षबागेचे क्षेत्रही कमालीचे वाढले. पण यंदाच्या हंगामात सुरूवातीपासूनच निसर्गाने शेतकऱ्यांना योग्य साथ दिली नसल्याने वेलीवरील घडांची संख्या कमी आहे. बागायतदारांनी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन महागड्या औषधांचा व खतांचा वापर करून आलेल्या मालाचा दर्जा टिकविण्याचा प्रयत्न केला. परंतु वादळ-वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे मणी फुटून द्राक्षांचे नुकसान झाले. वेलीवरच द्राक्षाचे घड पाणी साचल्याने कुजत आहेत. प्रमाणापेक्षा जादा पाणी झाल्याने द्राक्षाची गोडीही कमी झाली आहे. पावसामुळे मार्केटमध्ये मंदी असल्याने मुंबईला माल पाठविला जात नसल्याने, मोठे व्यापारी पलूस तालुक्यात फिरकलेच नाहीत. मार्च एण्ड आल्याने बॅँकांनी कर्ज वसुलीचा तगादा मागे लावला आहे. वर्षभर उधारीवर आणलेल्या खतांची, औषधांची देणीही देणे बाकी आहे. शेतात पीक असूनही त्याची विक्री कशी करायची? हा मोठा प्रश्न आहे.काही ठिकाणी चांगला माल बघून केरळ, कर्नाटक राज्यातील व्यापारी द्राक्षे खरेदी करत आहेत. पावसामुळे चिखल झाल्याने द्राक्षांच्या घडाची छाटणी करून कॅरेटमध्ये भरून वाहतूक करून माल रस्त्यावर व्यापाऱ्यांच्या वाहनापर्यंत वाहतूक करून पोहोचविला जात आहे. हा भुर्दंडही बागायतदारांनाच सोसावा लागत आहे.स्टॉल मांडून द्राक्ष विक्री सुरुरस्त्याकडेला बाग असणाऱ्या छोट्या शेतकऱ्यांनी स्टॉल मांडून दररोज थोेडा-थोडा माल विकणे सुरू केले आहे. प्रति एकरी सत्तर हजारांपासून लाख रूपयांची कर्जे काढून पिकासाठी केलेला उत्पादन खर्चही भागत नसल्याने शेतकऱ्यांना परमेश्वराच्या भरोशावर राहण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.