शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

भात मळणीसाठी ट्रॅक्टरचा वाढता वापर

By admin | Updated: November 17, 2014 23:53 IST

आजरा तालुका : पर्यावरणपूरक शेतीला धोका; भाताच्या उत्पादनात घट

कृष्णा साावंत -- पेरणोली --आजरा तालुक्यात भात सुगीचा हंगाम जोरदार सुरू झाला असून, पारंपरिक बैलांच्या मळणीऐवजी शेतकरी आता ट्रॅक्टरने भात मळणी काढू लागल्याने तालुक्यात बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे.शेती, बळिराजा आणि बैलांचे अतूट असे नाते आहे. बैलाद्वारे केलेली शेती पर्यावरणपूरक मानली जाते. मात्र, औद्योगिक प्रगती झाली तशी शेतीमध्येही यंत्रसामग्री वाढत चालली आहे. शेतामध्ये आता बैलांना दिल्या जाणाऱ्या हाका कमी ऐकू येऊ लागल्या आहेत. त्याऐवजी ट्रॅक्टर, पॉवर ट्रेलर, मळणीयंत्र यांचा आवाज घुमू लागला आहे.सध्या ग्रामीण भागात सर्वत्र भात मळणीची धांदल उडाली आहे. बैलांचे वाढलेले दर, खाद्यांच्या वाढलेल्या किमती आणि बैल बाळगण्याची शेतकऱ्यांमधील उदासीनता यामुळे बैल बाळगणाऱ्यांची संख्या कमी होऊ लागली आहे. त्याऐवजी भाड्याने यंत्र घेऊन शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढतो आहे. पूर्वीपासून चालत आलेल्या पारंपरिक पद्धतीनुसार खळ्यावर तिढा पद्धतीने मळणी काढली जात होती. तिढ्याला एक बैल बांधून त्याच्यासोबत पाच-सहा जनावरे बांधली जात होती. त्यांच्या पाठीमागे बैल हाकण्यासाठी एक व्यक्ती असायची. मात्र, गेल्या पंधरा वर्षांपासून ही पद्धत बंद होऊन दोन बैलांची पाटा पद्धत आली. सध्या काही शेतकरीच पाटा पद्धतीचा अवलंब करतात.चालू हंगामात मात्र बहुतांश शेतकऱ्यांचा कल ट्रॅक्टर, पॉवर ट्रेलर व मळणी यंत्राकडे आहे. बैलांद्वारे होणाऱ्या मळणीत आणि यंत्राद्वारे होणाऱ्या मळणीत मोठा फरक आहे. यंत्राद्वारे काढलेली मळणी लवकर होत असली, तरी बैलांच्या मळणीतून मिळणारे भात अधिक आहे. बैलांच्या मळणीतून मिळणारा आनंद कमी होत चालला आहे. शेतीत वाढत चाललेल्या यंत्रसामग्रीमुळे बैलांच्या पर्यावरणपूरक शेतीला धोका निर्माण झाला आहे.तालुक्यात शेतकऱ्यांनी घनसाळ, रत्नागिरी, सारथी, सोनम यासह नवीन बियाणे वापरली आहेत. मात्र, गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने व मानमोडी रोगामुळे भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने भाताच्या उत्पादनात घट झाली आहे.