शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

‘एज्युकेशन फेअर’ला वाढता प्रतिसाद

By admin | Updated: May 26, 2014 01:13 IST

विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी : ‘लोकमत’चे शैक्षणिक प्रदर्शन ११ जूनपासून

कोल्हापूर : विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील करिअरविषयक शेकडो प्रश्नांची उत्तरे देणारे ‘लोकमत’चे ‘अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर’ या शैक्षणिक प्रदर्शनास विविध संस्थांचा वाढता प्रतिसाद लाभत आहे. ११ ते १३ जूनपर्यंत असणार्‍या या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना आयुष्याच्या वाटचालीची गुरुकिल्ली मिळणार आहे. व्ही. टी. पाटील सांस्कृतिक भवन येथे सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत हे प्रदर्शन होणार आहे. महेश ट्युटोरियल्स लक्ष्य हे प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक असून, संजीवन इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट पन्हाळा हे सहप्रायोजक आहेत. पारंपरिक सीमा ओलांडून करियरच्या नव्या वाटा धुंडाळणार्‍या आजच्या पिढीला योग्य असे मार्गदर्शन करण्यासाठी ‘लोकमत’ने या शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. प्रदर्शनामध्ये कोल्हापुरासोबतच सातारा, सांगली, रत्नागिरी, पुणे येथील व्यवस्थापन, अभियांत्रिकी, फॅशन डिझायनिंग, फायर अभियांत्रिकी, माहिती-तंत्रज्ञान, हॉटेल मॅनेजमेंट, संगणक, अशा विविध नामवंत शैक्षणिक संस्थांचे स्टॉल्स आहेत. त्याचबरोबर रोज तज्ज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्याने, चर्चासत्रे होणार आहेत. एकाच छताखाली विद्यार्थी व पालकांना इत्यंभूत माहिती मिळणार असल्याने करिअरच्या वाटा शोधणे सहज शक्य होणार आहे. यावर्षीदेखील या प्रदर्शनाची उत्सुकता शैक्षणिक क्षेत्रात शिगेला पोहोचली असून स्टॉल बुकिंग सुरू आहे. स्टॉल बुकिंगसाठी ०९८८१८६७६०० या क्रमांकावर संपर्क साधावा. (प्रतिनिधी)