शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

सन्मती बँकेच्या भागभांडवल व ठेवींमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:18 IST

आर्थिक वर्षात २ कोटी ५४ लाख रुपयांचा ढोबळ नफा इचलकरंजी : अडचणीच्या काळातही सन्मती बँकेच्या भागभांडवल व ठेवींमध्ये प्रचंड ...

आर्थिक वर्षात २ कोटी ५४ लाख रुपयांचा ढोबळ नफा

इचलकरंजी : अडचणीच्या काळातही सन्मती बँकेच्या भागभांडवल व ठेवींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. बँकेला आर्थिक वर्षात २ कोटी ५४ लाख रुपयांचा ढोबळ, तर १ कोटी ९ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष सुनील पाटील यांनी दिली.

सन्मती सहकारी मल्टिस्टेट को-ऑप. बँकेची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासन नियमांचे पालन करत प्रधान कार्यालयासह शाखांमधील सदस्य ऑनलाईन सभेत सहभागी झाले होते. पाटील म्हणाले, मागील आर्थिक वर्षात उद्योगधंद्यामध्ये झालेली घट आणि वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात कोविड महामारीमुळे बँकिंग क्षेत्रात अनेक घडामोडी घडल्या. या काळात बँकेच्या सभासद, ग्राहक व हितचिंतकांनी दाखविलेल्या विश्‍वासामुळे बँकेची यशाची घोडदौड कायम राहिली. कोरोनामुळे वसुलीवर मोठा परिणाम जाणवला. सन २०२०-२१ सालासाठी विकास योजना आराखडा तयार केला असून त्या अंतर्गत व्यवसाय वृद्धीसाठी कर्नाटकातील बेळगाव, हुबळी, धारवाड जिल्हा कार्यक्षेत्र समाविष्ट करण्यात येणार आहे, तर शहर व परिसरात आवश्यक ठिकाणी ऑफसाईट एटीएम सेंटर सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रारंभी बँकेचे संचालक चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केले. नोटीस व विषयपत्रिकेचे वाचन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांनी केले. सर्वच विषयांना उपस्थित सभासदांनी एकमताने मंजुरी दर्शविली. याप्रसंगी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, पाणी पुरवठा सभापती विठ्ठल चोपडे, प्रकाश दत्तवाडे, प्रकाशराव सातपुते, विश्‍वनाथ अग्रवाल, गजानन होगाडे, बाळासाहेब कलागते, अशोकराव सौंदत्तीकर, भूषण शहा, बँकेचे संचालक, आदी उपस्थित होते. उपाध्यक्ष अजित कोईक यांनी आभार मानले.

फोटो ओळी - इचलकरंजीत सन्मती सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष सुनील पाटील यांनी माहिती दिली. यावेळी आमदार प्रकाश आवाडे, बॅकेचे मॅनेजर अशोक पाटील, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष अजित कोईक, महादेव कांबळे, आदी उपस्थित होते.