शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर विभागाच्या ‘आॅक्टोबर’च्या निकालात वाढ

By admin | Updated: November 26, 2014 00:23 IST

आॅनलाईन निकाल जाहीर : दहावी, बारावीत मुलींची आघाडी

कोल्हापूर : दहावी, बारावीच्या आॅक्टोबरच्या परीक्षेत यंदा कोल्हापूर विभागाचा निकाल सरासरी सात ते बारा टक्क्यांनी वाढला आहे. दहावीचा ३०.२, तर बारावीचा २५.१२ टक्के निकाल लागला आहे. तीन वर्षांनंतर निकालाच्या टक्केवारीचा आलेख वाढला असून, राज्यात कोल्हापूर दहावीमध्ये चौथ्या, तर बारावीत सहाव्या क्रमांकावर आहे. दोन्ही परीक्षेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज, मंगळवारी दुपारी एक वाजता दहावी व बारावीचा निकाल आॅनलाईन जाहीर केला.आॅनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर कोल्हापूर विभागीय मंडळाचे सचिव शरद गोसावी, अध्यक्ष भीमराव कांबळे यांनी पत्रकार परिषदेत निकालाची माहिती दिली. यावेळी शिक्षण उपसंचालक एम. के. गोंधळी, सहसचिव पी. डी. भंडारे, सहायक सचिव बाळासाहेब शेटे, लेखाधिकारी डी. वाय. कदम, आदी उपस्थित होते. गोसावी म्हणाले, कोल्हापूर विभागीय मंडळांतर्गत कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांसाठी दहावीसाठी ४९, बारावीसाठी २५ परीक्षा केंद्रांवर २६ सप्टेंबर ते २० आॅक्टोबर या कालावधीत परीक्षा घेण्यात आली. दहावीच्या परीक्षेसाठी ९ हजार ४०४ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २ हजार ८२३ विद्यार्थी उत्तीर्ण असून, त्यांची टक्केवारी ३०.२ टक्के आहे. तसेच बारावीची परीक्षा ८ हजार ६४९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, त्यापैकी २ हजार १७३ जण उत्तीर्ण आहेत. त्यांची टक्केवारी २५.१२ टक्के आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत दहावीच्या निकालात १२.४० टक्के, तर बारावीच्या निकालामध्ये ६.५७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दहावीतील मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ३.५४, तर बारावीत १०.७७ टक्क्यांनी अधिक आहे. तीन वर्षांनी विभागाच्या निकालाचा आलेख वाढला आहे. विद्यार्थ्यांमध्ये परीक्षांबाबत झालेली जागृती आणि शिक्षकांचे मार्गदर्शन याचा सकारात्मक परिणाम झाला आहे. या परीक्षांमध्ये गैरप्रकार करताना सापडलेल्या ११ जणांवर कारवाई केली आहे. शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांत ४ डिसेंबरला दुपारी तीन वाजता गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येणार आहे. पुनर्मूल्यांकनासाठी उत्तरपत्रिकांची छायाप्रत उद्या, बुधवारपासून १५ डिसेंबरपर्यंत घेता येईल. तसेच मूळ गुणपत्रिका मिळाल्यानंतर १२ डिसेंबरपर्यंत गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची मुदत आहे. (प्रतिनिधी)जिल्हानिहाय निकाल (%)जिल्हादहावी बारावी कोल्हापूर३६.३९२४.६२सांगली२८.२२२३.९३सातारा२४.९८ २६.७२उत्तीर्ण मुले-मुलींची टक्केवारीपरीक्षामुले मुलीदहावी२९.२४३२.७८बारावी२३.४२ ३४.१९राज्यात कोल्हापूर विभाग दहावीमध्ये चौथ्या, तर बारावीच्या आॅक्टोंबरच्या निकालात सहाव्या क्रमांकावर आहे. दोन्ही परीक्षेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक आहे.