शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
5
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
6
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
7
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
8
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
9
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
10
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
11
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
12
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
13
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
14
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
15
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
16
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
17
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
18
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
19
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
20
मोठी बातमी! कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश

कौटुंबिक समस्यांमध्ये होतेय वाढ!

By admin | Updated: March 18, 2015 23:58 IST

सात तालुक्यांतील चित्र : राज्य महिला आयोग - जिल्हा समन्वय संस्थेचा वार्षिक अहवाल

अमर मगदूम - राशिवडे -हुंड्यासाठी त्रास, मूल होत नाही, अशा अनेक कारणांमुळे अनेक कुटुंबांचे स्वास्थ्य बिघडून संसार उद्ध्वस्त झाले. मात्र, बदलत्या जीवनशैलीत कौटुंबिक समस्येने अनेकांचे संसार देशोधडीला लागत आहेत. कौटुंबिक समस्येत मानसिक जाच, शिवीगाळ, अपमानकारक वागणूक, छेडछाड ही किरकोळ कारणे गंभीर स्वरूप घेत आहेत. राज्य महिला आयोग व जिल्हा समन्वय संस्थेच्या वार्षिक अहवालात कौटुंबिक समस्येपेक्षा इतर कारणांमध्ये कमालीची घट नोंदविली आहे.हुंडा, मूल होत नाही, सासू-सुनेचे पटत नाही, दारू पिऊन मारहाण, चारित्र्यावर संशय, अशिक्षित या व अशा अनेक कारणांमुळे अनेक कुटुंबांत वाद होऊन अनेकांनी पोलीस ठाण्याच्या चकरा मारण्यातच संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. अशा घटना टाळण्यासाठी राज्य शासनाने राज्य महिला आयोगाची स्थापना करून तालुकानिहाय महिला समुपदेशन केंद्राची निर्मिती केली आहे. या समुपदेशन केंद्रात येणाऱ्या तक्रारींचे स्वरूप पाहता कौटुंबिक समस्येचे प्रमाण अधिक आहे.सोशल मीडिया, मोबाईल, टी.व्ही.च्या युगात कौटुंबिक समस्यांही बदलताना दिसत आहेत. सासू, सून, पती, भावजय, दीर, सासरे, अशा नात्यांमध्ये अविश्वासाने वाद निर्माण होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यातून वैवाहिक जीवन संपुष्टात येणे, आत्महत्या, नैराश्य अशा घटनांमध्ये वाढ होत आहे.स्त्रियांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे, त्यांना घटनेने दिलेले अधिकार व मानवाधिकार यांची माहिती व्हावी, यासाठी मासूम, सदाफुली, साथी यासारखी गावपातळीवरील केंद्रे कार्यरत आहेत. स्त्रियांवरील हिंसा हा संपूर्ण समाजाचा प्रश्न आहे, ही जाणीव निर्माण केल्यास त्याविरोधात एकत्रित प्रयत्न करता येतील.                                                                                                                                       - सुशीलाबेन शहा,                                                                                                                     अध्यक्षा, राज्य महिला आयोगनात्यांमध्ये किरकोळ कारणाने व अविश्वासामुळे वाद निर्माण होतात. त्याचे स्वरूप किरकोळ असते, तर कधी गंभीर असते. अशावेळी समुपदेशनाची गरज असते. या प्रक्रियेत न्याय तर मिळणारच; पण अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली जाते. तालुकावार अशा समुपदेश केंद्रांची निर्मिती करण्यात आली असून, महिलांनी आपल्यावर होणारे अत्याचार सहन न करता केंद्रात जाऊन तक्रार नोंदवावी. तक्रारदाराचे नाव, पत्ता गोपनीय ठेवला जातो.                                                                                                                       - आनंदा शिंदे-राशिवडेकर,                                                                                                          जिल्हा समन्वयक, महाराष्ट्र राज्य महिला आयोगमारहाण हे स्त्रियांवरील हिंसेचे उघड स्वरूप आहे. मानसिक जाच, शिवीगाळ, हीन वागणूक, लैंगिक छळ, छेडछाड त्याबरोबर सतत नियंत्रण ठेवणे, निर्णय घेऊ न देणे, स्वातंत्र्य नाकारणे ही महिलांवरील हिंसाच आहे. या हिंसेचा परिणाम स्त्रियांच्या मनावर, शरीरावर आणि संपूर्ण आयुष्यावर होत असतो. पीडित महिलांनी आयुष्यभर त्रास सहन करीत बसण्यापेक्षा महिला समुपदेशन केंद्रात आपली तक्रार नोंदविली पाहिजे. अशा पीडितांनी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी, समुपदेशक यांनी मार्गदर्शन करावे.                                                                                                                - चित्रा वाघ, सदस्या, राज्य महिला आयोगतालुका / हुंड्यासाठीदारू पिऊन मूल चारित्र्याचामुलगाअशिक्षितपतीचे सासू-सुनेचेकौटुंबिक जिल्हात्रासमारहाणहोत नाहीसंशयहोत नाहीअनैतिक संबंधवादसमस्याकागल१२७११८२०३४२९३९कोल्हापूर०३१००१०३१राधानगरी१२२२६१०१३४४२०२३भुदरगड५१२३१५४-११२३१२हातकणंगले८१३५१२५-१५१७२३पन्हाळा३४६५७४३५३४गडहिंग्लज१२७४१५५-८१५१४