शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील मिळकतींचे होणार सर्वेक्षण

By admin | Updated: May 17, 2015 01:09 IST

खासगी संस्थेकडे काम : घरफाळा उत्पन्न वाढ शक्य

कोल्हापूर : उपनगरांत होत असलेला विस्तार, वाढत्या अपार्टमेंटस्, जुन्या इमारतींत होत असलेली नवीन बांधकामे, मिळकतीच्या वापरात होत असलेले बदल आदी बाबींची गांभीर्याने दखल घेत शहरातील सर्वच मिळकतींचे नव्याने सर्वेक्षण करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. हे काम पालिकेच्या कर्मचाऱ्यांऐवजी खासगी संस्थेला देण्याचा विचार असून लवकरच तशी निविदा निघणार आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर घरफाळ्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नात किमान चाळीस टक्क्यांनी वाढ होण्याची अपेक्षा आहे. प्रत्येक दहा वर्षांनी शहरातील मिळकतींचे सर्वेक्षण होणे अपेक्षित असताना ते गेल्या कित्येक वर्षांत ते झालेले नाही. त्यामुळे शहराचा विस्तार होत असताना महापालिकेच्या घरफाळा उत्पन्नात म्हणावी तितकी वाढ झालेली नाही, हे आयुक्त पी. शिवशंकर यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच त्यांनी मिळकतींचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात सुमारे १ लाख ३० हजार मिळकती असून हे काम महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून होणे अशक्य आहे. विशिष्ट कालमर्यादेत हे काम पूर्ण व्हावे अशी मनपा प्रशासनाची अपेक्षा आहे. या कामासाठी निविदा काढण्यात येणार असून त्याच्या शर्थी व अटींवर चर्चा केली जात आहे. शहरात अनेक इमारती नवीन झाल्या आहेत, परंतु त्यांना अद्याप घरफाळा लागू झालेला नाही. काही मिळकतधारक आम्हाला घरफाळा लागू करा म्हणून स्वत:हून मागणी करत असतात, परंतु त्यांना कर्मचारी व अधिकारी भेटत नाहीत. काही ठिकाणी तर अखंड अपार्टमेंटला घरफाळा लावलेला नाही परंतु मनपाचे कर्मचारी तेथे पोहोचलेले नाहीत. आयुक्त शिवशंकर यांनी यात लक्ष घातल्यामुळे त्यांच्याही लक्षात या गोष्टी आल्या आहेत. (प्रतिनिधी)